

स्वप्निल लोणकर या तरुणाने एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केली होती. स्वप्निल लोणकरने आत्महत्या केल्यावर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांचे कर्ज आहे.
भाजपने या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज स्वप्निल लोणकर याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केला. हा धनादेश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडील सुनील तात्याबा लोणकर यांना हा १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबीयांवर कर्ज होते. आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते.
अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबीयांना भाजपच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : गंगेत तरंगणाऱ्या मृतदेहांची आपण माफी मागायला हवी
https://youtu.be/4uD7NXUeHQc