

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: 'पेगासस' हेरगिरी प्रकरण तसेच कृषी कायद्यासह इतर मुद्द्यांवरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी गुरुवारी प्रचंड गदारोळ घातला. 'पेगासस' हेरगिरी प्रकरण वरुन झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचे दिवसभराचे कामकाज वाया गेले. 'लोकांनी तुम्हाला येथे प्रश्न विचारण्यासाठी पाठविले आहे, घोषणाबाजी करण्यासाठी नाही' असे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार बजावले. तथापि विरोधी सदस्यांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
अधिक वाचा
सकाळी अकरा वाजता कामकाजास सुरुवात झाल्या झाल्या काँग्रेस, तृणमूलसह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वेलमध्ये येउन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी काही सदस्यांकडून विविध मागण्यांचे फलकही दाखविले जात होते. गोंधळ थांबवून चर्चा करावी, असा आग्रह अध्यक्ष करीत होते, पण त्याचा विरोधकांवर कोणताही परिणाम झाला नाही. गदारोळामुळे अध्यक्षांना कामकाज प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. त्यानंतर दुपारी २ वाजता आणि चार वाजताही गोंधळ न थांबल्यामुळे दिवसभराचे कामकाज गुंडाळावे लागले.
अधिक वाचा
बहुचर्चित ईस्त्रायली सॉप्टवेअर 'पेगासस' हेरगिरी प्रकरणी आज संसदेत गदारोळ झाला. राज्यसभेत केंद्रीय मंत्री अश्विनी
वैष्णव यांनी केलेल्या विधानावर तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेत गदरोळ घातला. यावेळी तृणमूलच्या सदस्यांनी
अश्विनी वैष्णव यांच्याकडील कागदपत्रे फाडली. यानंतर राज्यसभा सभापतींच्या आसनासमोर येत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
यावेळी मंत्री वैष्णव यांनी आपले म्हणणे सभागृहासमोर ठेवले. गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सकाळी दोनवेळा तहकूब करावे लागले. दुपारी दोन वाजता पुन्हा कामकाज सुरु झाले. राज्यसभा उपसभापति हरिवंश यांनी वैष्णव यांना आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली. विरोधी पक्षांनी गदरोळ सुरु केला. विरोधी पक्षांच्या सदस्यां कृती ही असंसदीय असल्याचे हरिवंश यांनी सांगितले. तर गदरोळामुळे वैष्णव यांना आपले म्हणणे पटलावर ठेवण्यास सांगितले.
विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या गदारोळारातच वैष्णव यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, इस्त्रायलच्या पेगासस'कडून भारतातील राजकीय नेत्यांची हेरगिरी केल्याचा दावाचा चुकीचा आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झालेल्या दिवशीच हे वृत आल्याने याबाबतचा संशय अधिक गडद हेातो. हा देशाची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे, अनिधिकृत व्यक्तीकडून देशातील काही जणांची हेरगिरी करणेच शक्य नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी तृणमूलचे खासदार आक्रमक झाले. यावेळी त्यांनी मंत्री वेष्णव यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेतली यानंतर ती फाडली. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांच्या जोरदार खडाजंगी झाली.
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केलेले वर्तन लजास्पद आहे. यामुळे देशातची प्रतिमा खराब झाली आहे, असे परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी सांगितले. समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव यांनीही या प्रकराचा निषेध केला आहे. मंत्री बोलत असताना त्याच्या हातातून कागदपत्रे हिसकावज़ून ती फोडणे हे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
पेगासस स्पायवेअरच्या वापर हा राजकीय नेते, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही अधिकारी यांची हेरगिरी
करण्यासाठी केला जात होता. ४० पेक्षा अधिक पत्रकारांवर स्मार्टफोनव्दारे पाळत ठेवली जात होती.
यापूर्वी २०१९मध्ये पेगासस स्पायवेअर स्मार्टफोनव्दारे पाळत ठेवली जात असल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्टसह जगभरातील अन्य १६ माध्यमांनी केला होता. यानंतर देशातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. या प्रश्नी सरकारने खुलास करावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.
हेही वाचलं का ?