हवामान अंदाज! कोल्हापूरसह कोकणसाठी रेड अलर्ट जारी | पुढारी

हवामान अंदाज! कोल्हापूरसह कोकणसाठी रेड अलर्ट जारी

पुढारी ऑनलाईन डेस्क; राज्यात सर्वदूर पावसाचा जोर आहे. मुख्यतः घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आज गुरुवारी (दि.२२) हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत उद्या शुक्रवारी (दि.२३) मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.

जुलैच्या मध्यावधीपर्यंत पावसाने उसंत घेतली होती. त्यानंतर हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु झाला. आणि आता राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कोकणसह कोल्हापुरात पावसाची तीव्रता वाढत असल्याने हवामान विभागाने या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.

नैसर्गिक आपत्तीत नागरिकांनी सतर्क रहावे यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येतो.

कोकणात पावसाचे तांडव…

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाने तांडव सुरु केलं आहे. धुवाँधार पावसाने चिपळूणमध्ये महाप्रलय केला आहे. शहराला पाण्याने वेढा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने थैमान घातले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर : सह्याद्रीतील अनोख्या हिरव्या बेडकाची गोष्ट

 

Back to top button