स्पाईक आला आणि आमचं आयुष्य बदलून गेलं; कोण आहे हा सचिनचा पाहूणा
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो वेगवेगळे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर मुंबई मधील एक रस्ता चुकला होता. त्यावेळी त्याला एका रिक्षा वाल्याने रस्ता दाखवला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
आताही सचिन तेंडुलकर एका व्हिडिओ मुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सचिन तेंडुलकरच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा नवा पाहुणा सचिनचा नवा श्वान आहे. सचिनने त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना सचिन म्हणतो, ??? ?? ??? … ????? ? सचिनने काल पहिल्यांदा स्पाईकचा फोटो शेअर केला होता. आज व्हिडिओ शेअर केला आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सचिन स्पाईकला उचलून घेत असलेला दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. सचिनचा घरातील हा नवा पाहुणा सर्वांना आवडला आहे.
सचिन तेंडुलकरने या अगोदर ट्रेनिंग, खास काही पदार्थ तयार करतानाचे व्हिडिओ सचिनने शेअर केले होते. आज केलेल्या व्हिडिओचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे.
सचिन तेंडुलकरला प्राण्यांविषयी खास प्रेम आहे. या पोस्टमधून सचिनने या पुढे देखील स्पाईक सोबत अनेक फोटो शेअर करणार असल्याचे संकेत दिले आहेत. अनेकांना स्पाईक हे नाव आवडले आहे

