

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉसच्या १३ चा विजेता आणि अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचं हृदयविकाराच्या झटक्याने मूत्यू झाला. मुंबईतील कूपर रुग्णालयात गुरुवारी (दि.२) रोजी सिद्धार्थ शुक्ला याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
यानंतर बॉलिवूडमधील 'धक् धक् गर्ल' माधुरी दीक्षित, अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री रश्मी देसाई हिच्यासह अनेक कलाकारांनी टविट्रवर शोक व्यक्त केला आहे.
या दरम्यान बॉलिवूड आभिनेत्री माधुरी दीक्षितने टविटरवर एक पोस्ट शेअर करत 'हे एक अविश्वसनीय आणि धक्कादायक वृत्त आहे. सिद्धार्थ शुक्ला तुमची नेहमी आठवण येत राहील. तुमच्या आत्म्यास शांती लाभो. कुटुंबाप्रती माझी मनःपूर्वक संवेदना' अशा शब्दांत शोक व्यक्त केला.
सिद्धार्थचे सकाळी निधन झाल्याचे समजताच अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर व्यक्त करत लिहिले आहे की, 'शब्दांच्या पलीकडचा धक्का बसला आहे. इतक्या लवकरच तु निघून जाईल असे वाटले नव्हते. तुमच्या कुटुंबाला, प्रियजनांना संवेदना. त्याच्यावर लाखो चाहत्यांचे प्रेम करत होते. #सिद्धार्थ शुक्ला तुमची आठवण येईल. तुमच्या आत्मास शांती लाभो. ओम शांती.'
बिग बॉसमध्ये एकत्र काम केलेल्या अभिनेत्री रश्मी देसाई हिने देखील सिद्धार्थच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. याशिवाय बॉलिवूड स्टार्ससोबत अनेक चाहते देखील दु:ख व्यक्त करत आहेत.
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही. आज दुपारी १२.३० वाजता शवविच्छेदन अहवाल येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसानी सांगितले आहे.
हेही वाचलंत का?