सातारा : कृष्णा कारखाना चेअरमनपदी तिसऱ्यांदा डॉ. सुरेश भोसले

सातारा : कृष्णा कारखाना चेअरमनपदी तिसऱ्यांदा डॉ. सुरेश भोसले
Published on
Updated on

कराड पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर डॉक्टर सुरेश भोसले यांची पुन्हा एकदा चेअरमनपदी वर्णी लागली आहे. तर माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप यांना पुन्हा एकदा उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.

अधिक वाचा

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेल आणि डॉक्टर इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील रयत पॅनेलचा मोठा पराभव करत विजय मिळवल्यानंतर सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे नेते डॉक्टर सुरेश भोसले यांची चेअरमनपदी एकमताने निवड झाली आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी चेअरमन निवड संपन्न झाली.

अधिक वाचा 

डॉक्टर सुरेश भोसले सर्वप्रथम 1999 साली कृष्णा कारखान्याचे चेअरमन झाले होते. त्यावेळी सहकार पॅनेल रयत पॅनेलचा पराभव केला होता. या पंचवार्षिक कालावधीत लोकरी माव्याचे संकट आल्याने डॉक्टर सुरेश भोसले यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळास एक वर्ष मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे सलग सहा वर्षे डॉक्टर सुरेश भोसले यांनी चेअरमन म्हणून कारखान्याचे कामकाज पाहिले होते.

2005 साली झालेल्या निवडणुकीत डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचा पराभव झाला होता. तर 2010 साली डॉक्टर सुरेश भोसले यांनी कारखाना निवडणूक लढवली नव्हती.

2015 साली झालेल्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने विजय मिळवत तत्कालीन चेअरमन अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलचा पराभव करत सत्तांतर घडवले होते. त्यावेळी दुसऱ्यांदा डॉक्टर सुरेश भोसले यांची दुसर्‍यांदा चेअरमन पदी निवड झाली होती.

अधिक वाचा 

या निवडणुकीनंतर जून 2020 मध्ये कारखान्याच्या संचालक मंडळास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ मिळाली होती. कोरोनामुळे निवडणूक केव्हा होणार ? याबाबत संभ्रमावस्था असतानाच अविनाश मोहिते समर्थक काले येथील डॉक्टर अजित देसाई यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना फेब्रुवारी 2021 मध्ये कारखाना निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मे महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती.

148 मतदान केंद्रांवर मतदान झाले होते

मागील महिन्यात 29 जून रोजी कारखान्यासाठी सातारा व सांगली जिल्ह्यातील 148 मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. या महिन्याच्या प्रारंभी 1 जुलैला मतमोजणी होऊन 1994 नंतर प्रथमच सत्ता कायम राखण्याची पुनरावृत्ती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने केली आहे.

डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम राखत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवत मोठा दिग्विजय मिळवला होता. त्यामुळे डॉक्टर सुरेश भोसले हेच पुन्हा चेअरमन होणार, हे जवळपास निश्चित होते. निवडणूक निर्णय त्यानुसार सोमवारी अधिकारी प्रकाश अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन निवड संपन्न झाली. चेअरमन निवडीनंतर उपाध्यक्ष निवड झाली. यावेळी पुन्हा एकदा वडगाव हवेली गावचे संचालक जगदीश जगताप यांना कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

हे ही वाचलत का :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news