सरला ठकराल यांनी १९३६ मध्‍ये भरारी घेत घडवला होता इतिहास

१९३६ मध्‍ये सरला ठकराल यांनी देशातील पहिल्‍या महिला वैमानिक होण्‍याचा बहुमान मिळविला.
१९३६ मध्‍ये सरला ठकराल यांनी देशातील पहिल्‍या महिला वैमानिक होण्‍याचा बहुमान मिळविला.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : घराचा उंबरठा ओलांडण्‍यासाठी महिलांना परवानगी घ्‍यावी लागत असे, असा तो काळ होता. यावेळी महिलांना एखाद्‍या वाहनात बसणे हेही स्‍वप्‍नवत हाेते. या काळात एक महिला अवकाशात भरारी घेते हेच सर्वांना अचंबित करणारे ठरलं. तिने केवळ विमानात बसून प्रवास केला नाही तर स्‍वत: विमान चालवलं. १९३६मधील या घटनेने समस्‍त पुरुषप्रधान व्‍यवस्‍था आवाक झाली होती. अशी ऐतिहासिक कामगिरी नाेंदविणार्‍या देशातील पहिल्‍या महिला वैमानिक होत्‍या सरला ठकराल. आज त्‍यांची १०७ वी जयंती. यानिमित्त गुगलने डूडल साकारुन सरला ठकराल यांच्‍या ऐतिहासिक कामगिरीचे स्‍मरण केले आहे.

सरला यांचा जन्‍म ८ ऑगस्‍ट १९१४ रोजी दिल्‍लीत झाला. त्‍यांचा विवाह  पी. डी. शर्मा यांच्‍याशी झाला. ते वैमानिक होते. पतीकडून त्‍यांना प्रोत्‍साहन मिळाले.

आपल्‍या पतीपासून प्रेरणा घेवून त्‍यांना वैमानिक होण्‍याचे स्‍वप्‍न पाहिले. ते वास्‍तवात उतरविण्‍यासाठी त्‍यांनी लाहौर प्‍लाइंग क्‍लबमध्‍ये प्रवेश घेतला. त्‍यांनी एक विमानही खरेदी केले होते. 'अ' श्रेणीचे लायसन्‍स मिळविण्‍यासाठी एक हजार तासांचे उड्‍डाणही पूर्ण केले. यानंतर त्‍यांना वैमानिक लायसन्‍स मिळाले.

आता अवकाशावर केवळ पुरुषांचा अधिकार नाही…

गुगलने डूडल साकारुन सरला ठकराल यांच्‍या ऐतिहासिक कामगिरीचे स्‍मरण केले आहे.
गुगलने डूडल साकारुन सरला ठकराल यांच्‍या ऐतिहासिक कामगिरीचे स्‍मरण केले आहे.

१९३६ साली वयाच्‍या २१व्‍या वर्षी एक जिप्‍सी मोथ जातीचे विमान सरला यांनी साडी नेसून उडवले हाेते.

त्‍यांनी विमान उड्‍डाण केले. यावेळी त्‍यांना चार वर्षांची एक मुलगीही होती.

यावेळी त्‍यांच्‍या ऐतिहासिक कामगिरीचे वृतपत्रांनी प्रशांसा तर केलीस त्‍याचबरोबर आता अवकाशावर केवळ पुरुषाचा अधिकार नाही, असे स्‍पष्‍ट करत भविष्‍यातील महिला युगाच्‍या नांदीचे संकेतही दिले होते.

चित्रकलेचा छंदही जोपासला…

दुसर्‍या महायुद्‍धानंतर  त्‍यांनी लाहौरमधील मेयो स्‍कूल ऑफ आर्ट्‍समध्‍ये ललित कला आणि चित्रकलेचे अध्‍ययन केले.

दिल्‍लीत परतल्‍यानंतरही त्‍यांनी आपला चित्रकेलेलचा छंद जोपासला. तसेच डिझायनिंग ज्‍वेलरीमध्‍येही त्‍यांनी करिअर केले.

देशातील पहिल्‍या महिला वैमानिक सरला यांनी केवळ इतिहास घडवला नाही तर देशातील मुलींना स्‍वप्‍न वास्‍तवात उतरवून अवकाशात भरारी मारण्‍याचा आत्‍मविश्‍वास दिला.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ :

डिंपल को सिम्पल नहीं समझनेका ! देवमाणूस फेम अस्मिता देशमुख बरोबर खास गप्पा !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news