

मुंबई;पुढारी ऑनलाईन : मशिदीवरील भोंगा आंदोलन सुरु होण्याआधी दररोज वल्गना केलेल्या, पण ४ मे रोजी प्रत्यक्षात पोलीस समोर दिसताच हातातून सुटून फरार झालेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ड्रायव्हरला पोलीसांनी अखेर उचलले आहे. त्याला बेदरकार गाडी चालवण्याच्या आरोपाखाली पोलीसांनी अटक केली आहे.
संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थसमोर पोहोचले होते. त्यावेळी पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असताना संदीप देशपांडे पोलीसांच्या हातातून गाडीत बसून सुसाट वेगात फरार झाले होते. यामध्ये महिला पोलीस कर्मचारी जमिनीवर कोसळली होती.
ड्रायव्हरला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. काल संध्याकाळी अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलीसांनी संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष साळी आणि ड्रायव्हर यांच्या विरोधात कलम ३०८, ३५३, २७९ आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचलं का ?