राज ठाकरेंची आंदोलने देश आणि राज्यासाठी नुकसानीचीच : अजित पवार | पुढारी

राज ठाकरेंची आंदोलने देश आणि राज्यासाठी नुकसानीचीच : अजित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

ज्याने हे भोंग्याचा मुद्दा पुढे आणला त्या व्यक्तीने टोल बाबतही आंदोलन केले होते. काय झालं? यांची आंदोलनं देशाच्या, राज्याच्या नुकसानीचे होती. टोल नाही घेतला तर एवढी मोठी रस्त्याची काम झाली नसतीच. ‘यूपी बिहार वाले परत जा’ या त्यांच्या आंदोलनामुळे काम बंद झाली आपली. पण त्यांना परत आणाव लागलं. खूप ठिकाणी दूध व्यवसाय करण्यासाठी बाहेरचे लोक आणावे लागतात. शेवटी आपला भारत आहे. संविधान आहे, कायदा सर्वांसाठी एक असतो, अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या ‘भोंगा आंदोलना’वर त्यांचे थेट नाव न घेता टीका केली.

काही लोकांना मीडियाचा हव्यास असतो. काही लोकांना करोडो रुपये खर्च करून प्रसिद्धी मिळते, काहींना मिळत नाही. कालपासून काही जणांनी बंद झालेल्या काकड आरत्या सुरू केल्या. हे असलं जे काही चाललंय ते थांबल पाहिजे. धार्मिक स्थळाबाबत आदर असला पाहिजे. लाऊडस्पीकर ज्यांनी परवाना घेतली ते लावू शकतात. मला काळजी आहे ग्रामीण भागातील जागरण गोंधळ, हरीनाम साप्ताह यांची. तो तुमचा अधिकार आहे. अशा प्रकारांमध्ये कार्यकर्त्यांची धरपकड होते, अन हे गॅलरीत ये जा करतात. ते मिडियाने दाखवलं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही बाबतीत जे हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट म्हणेल, ते ऐकायच असत.

दोन हजारांवर कामे झाली

आज दोन तीन बैठका झाल्या डीपीडिसी मधून 2 हजाराच्यावर काम झाली आहेत अजून ५ हजार काम बाकी आहेत. सर्व अधिकाऱ्यांना सांगतोय तुम्हाला दोनच वर्ष असतात काम करायला. वेळेत काम करा तातडीने काम करा. ग्रामपंचायती ज्या अडचणी आणतील त्यांना निधी देणार नाही. कायदेशीर कारवाई केली जाईल त्यामुळे वेळेत काम करा, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सूनावले.

पालकमंत्री शाळासुधार कार्यक्रम जाहीर

अजित पवार यांनी यावेळी पालकमंत्री शाळा सुधार कार्यक्रम जाहीर केला. यातून जिल्हा परिषद शाळांमध्ये सुधारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक जणांनी शाळा घेण्यास तयारी दर्शविली आहे. त्याबाबत काम चालू आहे, यानंतर या योजनेत मनपा शाळा पण घेणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षणाबाबत आज न्यायालयाचा निकाल येतोय. कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे पालन करावे लागते. त्याचा अवमान होता कामा नये. याबाबत काम सुरू आहे. एवढ्या मोठ्या ओबीसी समाजाच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल. राज्य निवडणूक आयोग कधी निवडणूक लावते हे पाहव लागेल.

संभाजी भिडे यांना कोणीही पाठीशी घालत नाही

संभाजी भिडे यांच्या बाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. काल शरद पवारांचीही चौकशी झाली. आयोग त्यांच काम करत आहे. भिडे यांना राष्ट्रवादीचा कोणी नेता पाठींबा देत नाही, पाठीशी घालत नाही. जो पाठिबा देत असेल, तो राष्ट्रवादीचा नाही, अशा शब्दात अजित पवारांनी भिडे यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

Back to top button