

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी (दि.२७) शिवाजी पूल येथे भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांचे पुनर्वसन करायला शासन तयार आहे. सध्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई संदर्भात राज्य मंत्रिमंडळात दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचा प्रयत्न शासनाचा असेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरोळ येथे महापूर पाहणीच्या दौऱ्यावर असताना दिले.
अधिक वाचा
शिवाजी पुलाला जोडून संलग्न नवीन ब्रिज बांधायचा की भराव करून रस्त्याची उंची वाढवायची का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह लोकप्रतिनिधी व उपस्थितांना विचारला. कॉलम उभारून पूल बांधल्यास पाणी खेळते राहील.
शिवाय महापुराच्या काळात प्रवाहाला अडचण येणार नाही. त्यामुळे नवीन पूल बांधण्याबाबत विचार करावा, अशी विनंती उपस्थितांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. नागपूर रत्नागिरी महामार्गावरील शिवाजी पूल हा महत्त्वाचा रहदारीचा मार्ग असल्याने चार पदरी रस्त्यामध्ये त्याचा अंतर्भाव आहे , असे यावेळी सांगण्यात आले.
अधिक वाचा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता शिरोळ येथील शाहूनगर जनता हायस्कूल विभागात शिरलेल्या महापूराची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली.
यावेळी नागरिकांनी आपले म्हणणे मांडत आमचे महापुराच्या कालावधीकरिता पुनर्वसन करावे.
आम्ही आमची गावे शेतजमिनी जनावरे सोडून जाणार नाही.
आपण मंत्रिमंडळाने अलमट्टीच्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा आराखडा तयार करावा, अशी मागणी केली.
प्रत्येक वर्षाला अलमट्टीच्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
हे नुकसान शेतकऱ्यांना झेपणारे नसून शेतकरी कर्जाच्या खाईत लोटत आहे.
बाधित गावे बाधित नागरिक आणि बाधित होऊ शेतीसाठी शासनाने भरीव मदत करावी. अशी मागणी केली.
नक्कीच आपल्या मागणीचा विचार करू मात्र आपण लोक ज्या ठिकाणी वास्तव्यास आहात ती जागा शासनाकडे सुपूर्द करावी लागेल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान अजित पवार यांनी अर्जुनवाड रोडवर आलेल्या महापुराच्या पाण्याची पाहणी केली. रस्त्याच्या कडेला बांधलेल्या जनावरांच्या मालक शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच चारा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती कविता चौगुले यांनी, वाढवली जाणारी रस्त्याची उंची, पाईप न टाकता करण्यात येणारा भरावा या संदर्भातील माहिती देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
त्यानंतर शिरोळ येथील श्री पद्माराजे विद्यालयातील निवारा छावणीला भेट देऊन पूरग्रस्तांची चर्चा केली.
यावेळी सर्वांनी पुनर्वसन व शेती नुकसान भरपाई या एकाच विषयाची ठाम मागणी केली
यावेळी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ जलसंपदा मंत्री जयंत पाटील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सह पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार यांनी पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली पूरग्रस्त गावातील स्वच्छतेबाबत अधिकाऱ्याकडून माहिती घेतली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी शाहूपुरी कुंभार गल्ली येथील पूरग्रस्तांच्या अडचणी ऐकून घेतल्या.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी राहुल रेखावार आमदार ऋतुराज पाटील आमदार चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
यानंतर पालकमंत्री शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेणार आहेत.
हेही वाचलं का ?