

पुढारी ऑनलाईन : लाडाची लेक गं बाई गं या झी मराठी वाहिनीवरील मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत अभिनेत्री स्मिता तांबे हिने एका तरुणाच्या आईची भूमिका साकारली होती. पण, स्मिता तांबे आता रिअल लाईफमध्ये आई झाली आहे. तिच्या घरी चिमुकल्या पावलांचं आगमन झालं आहे.
या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना काही दिवसांपूर्वी आपण आई होणार बातमी दिली होती. तिने सोशल मीडियावरून ही गोड बातमी दिली होती.
काही दिवसांपूर्वी स्मिताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमदेखील पार पडला होता. सोशल मीडियावर त्या कार्यक्रमाचे काही फोटो देखील शेअर केले होते. तिचा डोहाळे जेवणाचा व्हिडिओदेखील खूप व्हायरल झाला होता.
लाडाची मी लेक गं या मालिकेत स्मिताने उत्तम भूमिका साकारली होती. तिने साकारत असलेल्या पात्राचं खूपच कौतुक झालं होतं.
ती आई होणार असल्याने ती लाईमलाईटपासून दूर होती.
तिने २०१९ मध्ये विरेंद्र द्विदेवीसोबत लग्न केलं होतं. वीरेंद्र एक नाटककार आहे. तिच्या घरी नन्ही परी आल्याचे वृत्त तिने दिलेले नाही. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही बातमी मिळत नाहीये. पण, तिच्या मित्रमैत्रिणींच्या स्टोरीवरून ही गोड बातमी समजली आहे.
स्मिताजा जन्म सातारामध्ये झाला होता. ती एक स्वप्न घेऊन मुंबईत आली होती. स्मिताचा जन्म ११ मे, १९८३ रोजी सातारात झाला. तिचे बालपण पुण्यात गेले. मग, ती मुंबई येऊन चित्रपटांमध्ये काम करू लागली.
मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्ये आणि वेब सीरीजमद्येही तिने काम केलं आहे. 'द सेक्रेड गेम्स 2', 'माय नेम इज शीला' यासारख्या वेब सीरीजमध्ये किंवा 'पंगा' यासारख्या हिंदी चित्रपटांमद्ये तिने आपली अभिनयाची जादू दाखवली आहे.
जोगवा, तुकाराम, देऊळ यासारख्या मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला आहे. सिंघम रिटर्न्स, रुख, नूर, डबल गेम, पंगा यासारख्या बॉलीवूडपटात अभिनय केला आहे.
वेबसीरीज सेक्रेड गेम्स आणि माय नेम इज शीलामध्ये तिच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचलं का ?