

साडवली ; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात करंबेळे खाकेवाडी बसथांब्यासमोर तवेरा व खासगी आराम बस यांच्यात भीषण अपघात झाला. रत्नागिरी जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांत जोरदार पाऊस होत असल्याने अपघात घटनांमध्येही वाढ झाली आहे.
मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तवेरा चालक गंभीर जखमी झाला असून तवेरामधील अन्य काहीजण जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अधिक वाचा :
यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खासगी आराम बस मुंबईतून देवरूखकडे येत होती. तवेरा देवरूखहून संगमेश्वरच्या दिशेने जात होती.
ही दोन्ही वाहने करंबेळे खाकेवाडी बसथांब्याजवळ आली असता त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
अधिक वाचा :
हा अपघात एवढा भीषण होता की, तवेरा कारच्या दर्शनी बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तवेरा चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक काहीकाळ ठप्प झाली होती.
अधिक वाचा :
रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
हे ही वाचा :
हे ही पाहा :
[visual_portfolio id="5034"]