कोल्हापूर झेडपी समिती सभापती पदी ‘या’ नावांवर शिक्का | पुढारी

कोल्हापूर झेडपी समिती सभापती पदी 'या' नावांवर शिक्का

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर समिती सभापतींच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान कोल्हापूर झेडपी समिती सभातीच्या निवडी अखेर पार पडल्या आहेत. मंगळवारी (दि. 13) दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये विशेष बैठक बोलाविण्यात आली होती यावेळी निवड प्रक्रीया घेण्यात आली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पद वाटपाबाबत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सर्व सभापतींची पदे ही आघाडीतील घटक पक्षांना देण्यात आली आहेत. सभापतींची नावे मंगळवारी सकाळी जाहीर होतील. त्यामुळे या निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अधिक वाचा : 

बांधकाम सभापती वंदना जाधव, समाज कल्याण सभापती कोमल मिसाळ, शिक्षण समिती सभापती रसिका पाटील,
महिला व बालकल्याण सभापती शिवणी भोसले यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे.

बांधकाम समिती, शिक्षण समिती, समाजकल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती या चार समितीच्या सभापतिपदांच्या मंगळवारी निवडी झाल्या.

अधिक वाचा :

यापुर्वी चार समितींपैकी तीन शिवसेनेकडे व एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे समिती होती.

स्वाभिमानीच्या दोन्ही सदस्यांनी सभापतिपद भूषविले आहे. त्यामुळे हे पद आघाडीतील इतरांना देण्यात येणार आहे.

सभापतिपदांसाठी इच्छुक असणार्‍यांच्या मुलाखती पन्हाळा येथे रविवारीच घेण्यात आल्या आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामधाम येथे बसले होते. मंगळवारी (दि. 13) सकाळी अकरा वाजता नावे जाहीर करण्यात येणार आहेत.

या निवडणुकीचा कार्यक्रम अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीप्रमाणेच आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज भरणे. दुपारी 2 वाजता सभा सुरू.

सभेच्या सुरुवातीला अर्जांची छाननी, त्यानंतर माघारीसाठी मुदत देण्यात येईल व आवश्यकता भासल्यास मतदान घेण्यात येणार आहे

 

Back to top button