

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यात बहिणीच्या नावाने बनावट बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बहिणीच्या खात्यावर असलेल्या रक्कमेवर खोटी सही करून भावाने तब्बल २७ कोटी रुपयांची फसवणूक केली. या कटात बँक व्यवस्थापकासह ९ कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या सर्वाविरुद्ध सोमवारी रात्री ९ वाजता पुसद पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.
अधिक वाचा :
नंदकिशोर जुगलकिशोर जयस्वाल (वय ४३) रश्मी नंदकिशोर जयस्वाल, रवी जयस्वाल, सदाशिव नाना मळमणे, लक्ष्मीकांत चौधरी, रवी धुळधुळे, राजू कांबळे अशी या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अकोला जनता कमर्शियल बँकेच्या पुसद शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि तत्कालीन लेखापाल या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा :
जयस्वाल यांची बहीण जयश्री अजयकुमार मोरय्या ( वय ४५, रा. राजापेठ अमरावती) यांनी तक्रार दाखल केली.यानुसार त्यांचे पुसदमध्ये राहणारे भाऊ जयस्वाल यांनी बँक व्यवस्थापकाला हाताशी धरून बनावट दस्तऐवजाद्वारे मोरय्या यांचे अकोला जनता कमर्शियल बँकेत खाते उघडले.
२०१५ पासून जयस्वाल यांनी होलसेल विक्रेत्याकडून माल खरेदी करून विक्री केला.या व्यवहारापोटी बँक खात्याचा आधार घेऊन धनादेशावर बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचे उघडकीस आले. यात तब्बल २७ कोटी २५ लाख ३४ हजार ८६६ रुपयांची मोरय्या यांची फसवणूक केली.
अधिक वाचा :
हा प्रकार लक्षात आल्यानंतर जयश्री मोरय्या यांनी पुसद येथे धाव घेतली.वसंतनगर पोलीस ठाण्यात १२ जुलैला तक्रार दाखल केली.प्राप्त तक्रारीवरून वसंतनगर पोलिसांनी सोमवारी रात्री नऊ वाजता आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.या प्रकरणाचा तपास ठाणेदार रवींद्र जेधे करीत आहे.
हे ही वाचा :