मुंबई :  जयंत पाटील यांच्यामुळे संभाजी भिडेंना क्‍लीन चिट : प्रकाश आंबेडकर

मुंबई : जयंत पाटील यांच्यामुळे संभाजी भिडेंना क्‍लीन चिट : प्रकाश आंबेडकर

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यामुळेच कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना क्लीन चिट मिळाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र, डॉ. आंबेडकरांचा हा आरोप हास्यास्पद असून, त्यांनी याबाबतचा पुरावा द्यावा, असे आव्हान पाटील यांनी दिले आहे.

डॉ. आंबेडकर म्हणाले, भिडे यांना क्लीन चिट देणार्‍या तपास अधिकार्‍याने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र वाचलेले नाही. या प्रतिज्ञापत्रात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे दोषी असल्याचा उल्लेख आहे. तरीही भिडे यांना क्लीन चिट कशी काय मिळू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भिडे यांच्या पाया पडतानाचे छायाचित्र आहे. त्यामुळे लक्षात घेतले जावे की, सूत्रे कुठून हलत असतील? हा सगळा घोटाळा आहे आणि त्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असे शरद पवारही म्हणाले होते. यावरून राष्ट्रवादीमधील दुफळी बाहेर येत असल्याचे डॉ. आंबेडकर म्हणाले.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news