

[visual_portfolio id="7577"]
मुंबई; पुढारी ऑनलाईन : प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या इन्स्टाग्रामला खूप सारे फोटो पाहायला मिळतात. नुकताचं तिने एक फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत एक पोस्टदेखील आहे.
तिने कालचं एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सर्वांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे. तिला भटकंतीची आवड आहे. आता ती काहीतरी नवीन घेऊन येतेय. तिने इन्स्टाग्रामवर काल एक पोस्ट केली आहे.
अधिक वाचा-
ती लवकरच तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येतेय. ती तुम्हाला तिचं काही तरी गुपित सांगणार आहे. तिने नुकताच एक पोस्ट शेयर केली आहे.
तिने एका डायरीचा फोटो शेअर केला आहे. प्राजक्ता त्यामध्ये म्हणते, 'प्राजक्ताकडून लवकरच एक सुंदर भेट'.
प्राजक्ताने या पोस्टला कॅप्शन दिलीय. तिनं म्हटलं आहे, 'माझ्या ह्रदयाच्या अतिशय जवळ असलेली गोष्ट. माझी गूपीतं म्हणा हवं तर. लवकरच….खास तूमच्यासाठी.
अधिक वाचा-
पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. प्राजक्ता नक्की काय सांगणार, याकडे लक्ष लागले आहे.
ती आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही खास नव्या गोष्टी शेअर करत असते. प्राजक्ता माळी हिने त्याआधी आपले फोटो शेअर केले होते. तिचे ते साडीतले फोटो होते.
या फोटोतील तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले. पण, इतकचं नाही तर चाहत्यांनी कमेंटही दिली.
प्राजका हिला सौंदर्याची राणी अशी सुंदर कमेंट त्यांनी दिली.
प्राजक्ताला जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकांमधून प्रसिद्धी मिळाली.
प्राजक्ताने अनेक शोजदेखील केले आहेत. अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील तिने केले आहेत.
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ – "ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…" | हेमांगी कवी Exclusive