

पुणे ; पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत ब्राह्मण समाजावर टीका केली होती. या सभेतील मिटकरींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महा सभेतर्फे ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे.
ब्राम्हण संघाकडून मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून, मिटकरींनी भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला असंही म्हटलंय. पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलनकर्ते जमले असून, अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.