

[visual_portfolio id="6394"]
मडगाव; पुढारी वृत्तसेवा : सांगेतील साळावली जलाशय भरून वाहू लागला आहे. संपूर्ण दक्षिण गोव्याबरोबर उत्तर गोव्यातील काही भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या सांगेतील साळावली धरणाला राज्यात फार महत्त्व आहे. पाणी पुरवठ्याबरोबर साळावली धरण आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे भरून वाहणाऱ्या जलाशयासाठी.
अधिक वाचा :
भरून वहात असलेल्या साळावली जलाशयाचे सौंदर्य डोळे भरून पाहण्यासाठी देश विदेशातील लोक तब्बल नऊ महिने वाट पाहतात.
या मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर आज मंगळवारी सकाळी तो क्षण आला. सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी साळावलीचा जलाशय भरून वाहू लागला.
अधिक वाचा :
धरणातील पाणी उंचावरून खाली पडले की त्यातून पाण्याचे फवारे वर येतात. हे दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक धरणाला भेट देतात.
गेल्या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर सामान्य लोकांसाठी धारणाचे गेट्स बंद करण्यात आले होते. त्यामुळे लोकांचा हिरमोड झाला होता.
अधिक वाचा :
यंदा जरा लवकरच धरणातून पाणी पडायला लागले आहे. पण कोविडचे नियम शिथिल न झाल्याने यंदा सुद्धा पर्यटकांना धरणावर प्रवेश मिळणार नसल्याचे समजते. साळावली धरणातून पाणी पडू लागल्याने जुवारी नदी सुद्धा भरून वाहू लागली आहे.
हे ही वाचा :