

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था इस्त्रो : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आज जिओ इमेजिंग हा बहुप्रतीक्षित उपग्रह (जी सॅट 1) प्रक्षेपित केला. या उपग्रहाला 'आय इन दि स्काय' (आकाशातील डोळा) असे संबोधले गेले.
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतराळ संशोधन केंद्रातून पहाटे 5 वाजून 43 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले, मात्र क्रायोजेनिक इंजिनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे इस्त्राचे हे मिशन अयशस्वी ठरले.
इस्त्राचे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटलं आहे की, प्रक्षेपणाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडीमुळे ही GSLV-F10/EOS-03 मोहिम पूर्ण होऊ शकली नाही.
या मोहिमेच्या यशस्वीतेने भारताला खूप फायदा होणार होता. जीएसएलवी-एफ 10 रॉकेटव्दारे भू्-अवलोकन उपग्रह ईओएस-03 च्या प्रक्षेपणासाठी २६ तासांचा काउंट काऊंटडाऊन श्रीहरिकोटा येथून बुधवारी सुरू झाला होता.
स्पेसफ्लाईट नाऊ नुसार, इसरो EOS-03 उपग्रहाला कक्षेत स्थापित करण्यात अयशस्वी ठरला आहे. इसरोकडून जीएसएलव्ही एमके लॉन्च मध्ये क्रायोजेनिक चरण मध्ये तांत्रिक बिघाडामुळे ही मोहिम अपयशी ठरली.
फेब्रुवारी मध्ये ब्राजीलच्या भू-अवलोकन उपग्रह एमेजोनिया-१ आणि १८ अन्य छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणानंतर २०२१ मधले इस्त्रोचे हे दूसरे प्रक्षेपण होते.
प्रत्यक्षात, इसरोने आज (गुरूवार) सकाळी ५.४३ मध्ये यशस्वीपूर्वक प्रक्षेपण केले होते. ठरलेल्या वेळेनुसार सर्व टप्पे पूर्ण होत गेले होते.
मात्र शेवटी EOS-3 च्या विलग होण्याच्या आधी क्रायोजेनिक इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. ज्यामुळे इस्त्रोला आकडे मिळणे बंद झाले.
या उपग्रहामुळे भारतीय उपखंडातील विविध भागांची अत्यंत स्पष्ट अशी छायाचित्रे 24 तास घेता येऊ शकतील, असे इस्त्रोने म्हटले आहे.
पीक लागवडीच्या क्षेत्राबद्दलची छायाचित्रांसह सविस्तर माहिती या उपग्रहाच्या माध्यमातून मिळणार होती.
याशिवाय दुष्काळ आणि पूरस्थितीवर लक्ष ठेवणेही शक्य होणार होते.
या उपग्रहाचे मूळ नाव जी सॅट 1 असे आहे. त्याला जिओ इमेजिंग उपग्रह असेही म्हटले जाते.
चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर या उपग्रहाद्वारे लक्ष ठेवता येणार आहे. त्यामुळेच या उपग्रहाला 'आय इन दि स्काय' असे म्हटले जाते.
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36 हजार किलोमीटर अंतरावर तो स्थिरावेल.
या उपग्रहाद्वारे दिवसातून किमान चार ते पाचवेळा देशाचे छायाचित्र काढले जाईल. त्याद्वारे हवामानाबाबतचा डेटा पाठविला जाईल.
या उपग्रहाचे वजन 2,268 किलो आहे.