काडीपेटीतून काडी काढत असतानाच माजी सभापती चोपडे, युवराज शिंगाडे, विजय रवंदे, रणजीत शिंगाडे यांनी धाव घेवून काडेपेटी काढून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
त्यानंतर पालिकेच्या कर्मचार्यांनी त्यांच्या अंगावर पाणी मारले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी पालिकेत धाव घेतली.
दरम्यान, लंगोटे यांचे वैद्यकीय बिल 40 हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे त्याला स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे.
शिवाय पेन्शनची रक्कमही दोन ते तीन दिवसात मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
काही महिन्यांपूर्वीच पालिकेच्या आवारात नरेश भोरे यांनी आत्मदहन केले होते. या घटनेची चर्चा यावेळी सुरू होती.