

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेलदोडे: आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी पिणे, व्यायाम करणे, कोरा चहा पिणे असे अनेक उपाय आपण करत असतो. या उपायांबरोबरच रोज सकाळी वेलदोडे (Veldode) खाणेही आरोग्यासाठी लाभदायक आहे.
तरुणांसाठी तर वेलदोडे अत्यंत उपयुक्त आहेत. रोज सकाळी एक खाऊन त्यावरून दूध पिल्याने शरीरातील वीर्य वाढण्यास मदत होते. वेलदोडे खाल्याने तोंडाच्या अनेक आजारांपासून मुक्ती मिळते तसेच ज्यांचे केस गळत आहेत अशांनी वेलडोडे खाऊन त्यावरून पाणी पिल्यास केस गळतीसारख्यी समस्या सुटेल. झोप येत नसलेल्यांनी झोपताना एक वेलदोडा खाऊन त्यावरून एक ग्लास पाणी पिले तर लगेच गाढ झोप येईल. याबरोबरच वेलदोडे खाण्याचे अनेक फायदे आहेत.
वेलदोडे खाल्याने घशात आणि पोटात होणारी जळजळ कमी होते. तसेच पोटातील सूज कमी होते. पित्त आणि पोट साफ न होण्यासारख्या तक्रारी वेलदोडा खाल्याने दूर होतात.
सतत सर्दी असणाऱ्यांच्या घशात खूप वेदना होत अतात या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी रोजच्या आहारात वेलदोड्यांचा वापर करावा. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एक-दोन वेलदोडा चाऊन खा. त्यानंतर कोमट पाणी पिल्यानंतर काही वेळातच घशात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळेल.
वेलदोड्यांमध्ये रक्तदाबावर ताबा मिळवण्याची ताकद आहे. वेलदोड्यात पोटॅशिअम आणि फायबर असते ते रक्तदाबावर नियंत्रण मिळवते. रक्तदाबाच्या रूग्णांनी जेवणानंतर वेलदोडे खावेत.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेलदोडा खाणे गरजेचे आहे. याबरोबरच दृष्टी वाढविण्यासाठीही वेलदोडा फायदेशिर आहेत. वेलदोड्यांच्या एक-दोन दाण्यांमध्ये दोन-तीन चमचे दूध घालून त्याला मिक्सरमध्ये घालून एकजीव करा. त्यानंतर या मिश्रनात एक ग्लास दूध मिसळून ते पिल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच तणाव असतो. तणावापासून आराम मिळावी यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. मात्र, वेलदोडा हे असे औषध आहे जे आपला तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच एकटेपणा दूर करण्यासाठीही वेलदोडे खाणे फायदेशिर ठरते. वेलदोडा सतत चघळल्याने किंवा वेलदोड्यांचा चहा पिल्याने हार्मान्समध्ये बदल होतात आणि काही वेळातच तणाव कमी होण्यास मदत होते.
हे ही वाचलं का?