झायडस कॅडिला लसीला चालू आठवड्यात मिळणार परवानगी | पुढारी

झायडस कॅडिला लसीला चालू आठवड्यात मिळणार परवानगी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : झायडस कॅडिला कंपनीकडून कोरोनाविरुद्ध विकसित केल्या जात असलेल्या झायकोब-डी लसीला चालू आठवड्यात परवानगी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती सोमवारी सूत्रांनी दिली. देशात सध्या पाच लसींना परवानगी देण्यात आलेली आहे. झायडस कॅडिला कंपनीच्या झायकोब-डी ला परवानगी मिळाली तर ती मान्यता प्राप्त सहावी लस ठरेल.
गेल्याच आठवड्यात सरकारने अमेरिकेच्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या सिंगल डोस लसीला परवानगी दिली होती. अहमदाबादस्थित झायडस कॅडिलाने झायकोब-डीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी द्यावी, अशी विनंती ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) केली होती. यावर डीसीजीआयने कंपनीकडे आणखी डेटा सादर करण्यास सांगितले होते.
हा डेटा देण्यात आला असून चालू आठवड्यात झायकोब-डी च्या आपत्कालीन वापरास परवानगी मिळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
परवानगी प्राप्त झाल्यानंतर ही देशात विकसित झालेली तिसरी लस ठरेल.
झायडस कॅडिलाकडून विकसित करण्यात आलेली लस लहान मुलांवरही प्रभावी ठरू शकते, असा दावा केला जात आहे.
हे ही वाचलं का?

Back to top button