

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीसोबत जबरदस्तीने शरिरसंबंध ठेवल्यानंतर त्याचे मित्रामार्फत चित्रीकरण केले. त्यानंतर ते व्हिडीओ इतर दोन मित्रांना पाठवले. त्या मित्रांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडे शरिरसुखाची मागणी केली. हा प्रकार घडल्यानंतर संबंधीत तरुणी तिच्या मित्राच्या आईला सांगण्यासाठी घरी गेली. मात्र तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना कोंढव्यातील आश्रफनगर परिसरात घडली आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणीचा मित्र त्याची आई-बहीण व मित्राचे इतर दोन मित्र अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 20 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना ऑगस्ट 2021 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी व आरोपी हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अश्रफनगर येथील एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये शरिरसंबंध प्रस्थापित केले. त्याचे एका दुसर्या मित्राच्या मार्फत चित्रीकरण केले. काही दिवसानंतर ते चित्रीकरण इतर दोन मित्रांना पाठवले. त्या दोन मित्रांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली.
हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने मित्राच्या आईची भेट घेऊन झालेला प्रकार त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी व त्यांच्या मुलीने तरुणीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच आरोपी मित्राच्या मोठ्या बहीणीने तरुणीला, 'जास्त नाटक केलीस तर तुझे व्हीडीओ आहेत, ते आम्ही व्हायरल करू', अशी मधकी दिली. या प्रकारानंतर पीडित तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.