मृतआकाश पिल्ले
मृतआकाश पिल्ले

पुणे : पीएमटी ने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू

Published on

येरवडा, पुढारी वृत्तसेवा : दुचाकी वरील तरुणाला पीएमटी ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागूच मृत्यू झाला. आकाश विल्सन पिल्ले (31, रा. येरवडा गाडीतळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पीएमटी बस चालक अजय कामठे (रा. उरळी कांचन ) याच्या विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात डेक्कन कॉलेज जवळील चंद्रमा चौकात मंगळवारी रात्री झाला.

पीएमटी बस (एमएच 12, आर एन 9076) आळंदी हून स्वारगेट ला जात होती. याच दरम्यान, दुचाकी वरून आकाश जात असताना पीएमटी ने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपाचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता उपचार सुरु असताना तो मृत झाला. मयत आकाश हा विवाहित आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून बस चालक अजय कामठे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news