

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजने भारतासमोर 119 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 गडी गमावून 118 धावा केल्या. दीप्ती शर्माने भारतासाठी इतिहास रचला. तिने सामन्यात चार षटकांत 15 धावा देत तीन बळी घेतले. तीन विकेट घेतल्यानंतर ती टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली.
तिने पूनम यादवला (98 बळी) मागे टाकले. याशिवाय दीप्तीने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. पुरुष आणि महिला अशा दोन्ही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळींचा टप्पा गाठणारी ती पहिली भारतीय आहे. भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंमध्ये युझवेंद्र चहलच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत.
त्याने 91 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 100 बळींचा आकडा गाठणारी दीप्ती महिलांमध्ये नववी गोलंदाज ठरली आहे. दीप्तीने भारतासाठी आतापर्यंत 83 टी-20 सामन्यांत 100 बळी घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदच्या नावावर आहे. त्याने 125 विकेट घेतल्या आहेत.
संघ
भारत : स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, रिचा घोष, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका सिंग ठाकूर
वेस्ट इंडिज : हेली मॅथ्यूज (कर्णधार), स्टॅफनी टेलर, शेमेन कॅम्पबेल, शाबिका गजनाबी, चिनेल हेन्री, चाडियन नेशन, अफी फ्लेचर, शमिलिया कोनेल, रश्दा विल्यम्स (विकेटकीपर), शेकेरा सेलमन, करिश्मा रामहारेक
हेही वाचा;