

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरवर bollywood boycott आणि वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांचा बहिष्कार सुरू आहे. अनेक चित्रपटांच्या नावावरून बायकॉटचा ट्रेंड सुरू आहे. हा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आतापर्यंत अर्जुन कपूर, तापसी पन्नू, करण जोहर, आमिर खान, रणबीर कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे चित्रपट बायकॉट ट्रेंडवर आहेत. विजय वर्मा ते विवेक अग्निहोत्री यांसारख्या इतर सेलिब्रिटींनी या ट्रेंडवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विवेक अग्निहोत्री आणि शर्लिन चोप्रा यांसारखे स्टार्स बॉलीवूडवर निशाणा साधत असताना अर्जुन कपूरने मात्र आता तर मर्यादाच गाठल्याचे कठोर शब्दात म्हटले आहे. आता तो गप्प बसणार नाही. अर्जुनच्या या विधानावर बराच वाद झाला आणि त्याला ट्विटरवर प्रचंड ट्रोल करण्यात आले. आता या संपूर्ण प्रकरणावर बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदने (Urfi Javed ) देखील प्रतिक्रिया दिली आहे. (Urfi Javed )
बहिष्काराच्या ट्रेंडवर उर्फी जावेद भडकली. तिने ट्रोलर्सची खिल्ली उडवली आणि विचारले की ते बलात्कारी आणि गुन्हेगारांवर बहिष्कार का घालत नाहीत? अशा गुन्हेगारांवर बहिष्कार टाकण्याच्या बातम्या मला का दिसत नाहीत. अशा प्रकारची लाट बलात्कार्यांसाठी दिसत नाही. शेवटी आपण गुन्हेगारांसाठी अशी पावले का उचलत नाही.
उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये उर्फीच्या वक्तव्यावरून ट्रोलर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही वापरकर्त्यांनी सांगितले की, आता आम्ही फक्त उर्फीवर बहिष्कार टाकतो. त्याचवेळी काही युजर्सनी अभिनेत्रीचे समर्थन केले.
विवेक अग्निहोत्री यांनी बहिष्काराबद्दल म्हटले होते की, लोकांमध्ये चित्रपट इंडस्ट्रीबद्दल नाराजी आहे.
त्याचवेळी अर्जुन कपूरने बहिष्काराबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, आतापर्यंत इंडस्ट्री बहिष्काराला हलक्यात घेत होती. पण आता पाणी डोक्यावर आहे. त्याचं मौन हा त्याचा कमजोरपणा समजला जात होता. आता तो त्याविरोधात बोलणार. या विधानानंतर अभिनेत्याला ट्विटरवर प्रचंड ट्रोल करण्यात आले.