Anushka Sharma : अनुष्काचे शॉर्ट ड्रेसमध्ये सुंदर फोटोज, फिटनेस पाहिला तर… | पुढारी

Anushka Sharma : अनुष्काचे शॉर्ट ड्रेसमध्ये सुंदर फोटोज, फिटनेस पाहिला तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अनुष्का शर्माने शुक्रवारी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केलेत. अनुष्काने (Anushka Sharma ) तिच्य़ा लेटेस्ट पोस्टमध्ये, अभिनेत्री अनुष्का एका पार्कमध्ये एका बेंचवर बसलेली दिसत आहे. अनुष्का शर्माने पिवळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा चष्मा, क्रीम कलरचा शॉर्ट कलरचा ड्रेस घातला आहे. पहिल्या दोन फोटोंमध्ये अनुष्का शर्मा कॅमेरापासून दूर दिसत आहे. पुढील फोटोमध्ये अनुष्का चेहऱ्यावर हात ठेवून डोळे मिटून हसताना दिसत आहे. फोटो शेअर करत अनुष्काने लिहिले की, पार्कमध्ये फिरण्यापेक्षा चांगले काय असू शकते? (Anushka Sharma )

अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत युरोप दौऱ्यावरून परतली आहे. युरोप दौऱ्यावर गेलेल्या अनुष्का आणि विराटने तिथे पोहोचून भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला.

अनुष्का शर्मा प्रोसित रॉय दिग्दर्शित चकडा एक्सप्रेस या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत अनुष्का शर्मा म्हणाली की, लोकांना झुलन गोस्वामी आणि त्यांच्या बलिदानाबद्दल माहिती असायला हवी. झुलनने क्रिकेटपटू बनण्याचा आणि देशासाठी खेळण्याचा निर्णय अशा वेळी घेतला जेव्हा महिलांनी खेळाला आपले करिअर करण्याचा विचारही केला नव्हता. चकडा एक्स्प्रेस या चित्रपटातून अनुष्का शर्मा तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. हा चित्रपट यावर्षी १० नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

२०१२ साली क्रिकेटपटू झुलन गोस्वामीला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button