बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय झालं? | पुढारी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय झालं?

गया; पुढारी ऑनलाईन : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. बिहारमधील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते निघाले होते. पाच जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीची हवाई पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार शुक्रवारी पाटणाहून रवाना झाले होते. पण खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव देखील असल्याचे समजते. नितीश कुमार जेहानाबाद, अरवाल आणि इतर जिल्ह्यांतील दुष्काळ स्थितीची पाहणी करणार होते, मात्र अचानक खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हवामानात अचानक बदल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर गया विमानतळावर उतरले आहे. गयामध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर सीएम नितीश कुमार रस्तामार्गे पाटण्याला रवाना झाले.

बिहारमध्ये जदयूने (जनता दल युनायटेड) भाजपशी फारकत घेऊन ‘राजद’सोबत सरकार स्थापन केले आहे. यामुळे भाजपला मोठा धक्‍का बसला. दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या राजद (RJD) आणि इतर विरोधी पक्षांसोबत नवीन “महाविकास आघाडी” जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांनी नुकताच आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. बिहारमध्ये जदयूने भाजपशी काडीमोड घेतला आहे. त्यांनी ‘राजद’सोबत (राष्ट्रीय जनता दल) नवा घरोबा केला आहे. जदयूचे भाजपसोबत संबंध ताणले गेले होते. ते तुटल्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी ‘राजद’सोबत सरकार स्थापन केले आहे.

Back to top button