Wedding VIDEO : नवरदेवाला विचारलं, “सर्वात मोठे व्‍यसन कोणते” ? उत्तर ऐकून खळखळून हसाल…

Wedding VIDEO : नवरदेवाला विचारलं, “सर्वात मोठे व्‍यसन कोणते” ? उत्तर ऐकून खळखळून हसाल…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

मांडव सजला, नवरी आणि नवरदेव मांडवात आले. लग्‍नविधी सुरु झाला. यावेळी भटजींनी नवरदेवाला एक प्रश्‍न विचारला. प्रश्‍न होता, "माणसाला असणारे सर्वात मोठे व्‍यसन कोणते?", यावर नवरदेवाने दिलेल्‍या उत्तराने नवरीसह वर्‍हाडी मडळी हसून बेजार झाली तर काहीजण अवाक झाले. या घटनेचा व्‍हिडीओ ( Wedding VIDEO ) सध्‍या सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.

लग्‍नाचा सीझन सुरु झाला की, लग्‍नांमधील गंमतीजंमतींच्‍या व्‍हिडीओचा पाऊस पडतो. वधू अणि वराची उडालेली फजिती असो की अति उत्‍साही वर्‍हाड्याची उडालेली भंबेरी, असे लग्‍नातील खास क्षण इंटरनेटवर व्‍हायरल होतात. नेटकर्‍यांचा त्‍याला प्रतिसादही उंदड मिळतो. असाच एक व्‍हिडिओ सध्‍या व्‍हायरल होत आहे. लग्‍नविधी सुरु असताना भटजी नवरदेवाला असा काही प्रश्‍न विचाराला आणि त्‍याला तेवढ्या थंड डोक्‍याने नवरदेवाने दिलेले उत्तर ऐकून तुम्‍ही खळखळून हसाल.

सर्वसाधारणपणे लग्‍नविधी पार पडत असताना भटजी हे नवरदेव आणि नवरीला सर्व विधी समजवून सांगतात त्‍याचे महत्‍वही सांगितले जाते. मात्र काहीजण लग्‍नातील आनंद व्‍दिगुणीत होण्‍यासाठी जाणीवपूर्वक असे काही प्रश्‍नही विचारले जातात. अशाच एका क्षण या व्‍हायरल व्‍हिडीओमध्‍ये दिसत आहे.

Wedding VIDEO : प्रश्‍न हटके तर उत्तरही भन्‍नाट…

लग्‍नविधी सुरु असताना भटजी नवरेदवाला प्रश्‍न करतात, " सांगा सर्वात मोठे व्‍यसन कोणते आहे". प्रश्‍न ऐकून नवरदेवही सर्वांचीच 'फिरकी' घेण्‍याचे ठरवतो. तो म्‍हणतो, "जेवण हे सर्वात मोठे व्‍यसन आहे". हे उत्तर ऐकून भटजी आवक होतो. तो प्रत्‍युत्तर देताना म्‍हणतो की, " काय बोलताय साहेब?, आता तुमचे पोट भरले तर व्‍यसनच संपून जाईल". दोघांनी एकमेकांना दिलेल्‍या उत्तराने नवरीसह वर्‍हाडी हसून बेजार झाली तर काहीजण अवाक झाले. हा व्‍हिडीओ इंस्‍टाग्रामवर व्‍हायरल झाला असून आतापर्यंत याला आठ हजाराहून अधिक लाईक्‍स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalyani sinha (@kalyani_life)

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news