पुढारी ऑनलाईन डेस्क
टीम इंडियाने दमदार कामगिरी करत वेस्टइंडिजविरुद्धची टी-20 मालिका जिंकली आहे. ( IND vs WI T-20 ) आता तिसरी टी-२० सामन्यासाठी संघ सज्ज आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) विराट कोहली आणि
यष्टीरक्षक ऋषभ पंत यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. तिसर्या टी-२० सामन्यासाठी विराट कोहली आणि ऋषभ पंत खेळणार नाहीत.
'बीसीसीआय'ने या दोघांनाही 'बायो बबल'साठी (स्पर्धेत सहभागी असलेले खेळाडू हे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी संबंधित खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरण व्यवस्थेत ठेवणे. यामध्ये खेळाडूंचा बाह्य जगाशी संपर्क ठेवण्यास निर्बंध येतात.) १० दिवसांचा ब्रेक दिला आहे.
'बायो बबल' संपलं की, विराट कोहली आणि ऋषभ पंत हे दोघेही पुन्हा एकदा टीम इंडियाशी जोडले जातील. विराट कोहली हा दक्षिण आफ्रिका दौर्यापासून सलग क्रिकेट खेळत आहे. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौर्यातील दोन कसोटी आणि वन डे मालिकेतही तो सहभागी झाला होता. यानंतर वेस्ट इंडिजच्या तीन वन डे आणि दोन टी-२० सामन्यामध्येही त्याचा सहभाग होता.
मागील अडीच महिन्यांपासून विराट हा दोन कसोटी सामने, सहा वन डे आणि दोन टी-२० सामने खेळला आहे. ऋषभ पंतही मागील अडीच महिन्यांपासून कसोटी सामने, सहा वन डे आणि दोन टी-२० सामने खेळला आहे. सलग क्रिकेट खेळल्यामुळे दोघांना बीसीसीआयने आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसर्या टी-२० सामन्यात अर्धशतक झळकावले होते. या दोघांच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाच्या अन्य फलंदाजांवरील जबाबदारी वाढणार आहे.
विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार असल्यामुळे त्याच्या तिसर्या टी-२० सामन्यासाठी श्रेयस अय्यर याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली याने तिसर्या टी-२० आधीच विराटने घर गाठले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितले की, विराट कोहली शनिवारी सामना झाल्यानंतर घरी गेला. भारताने ही मालिका जिंकल्यामुळे विराटला तिसर्या सामन्यापूर्वी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. जे खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये ( टी-20, कसोटी आणि वन डे ) खेळतात त्यांना वेळोवेळी 'बायो बबल' च्या माध्यामतून ब्रेक दिला जाईल. यामुळे खेळाडू हे मानसिकदृष्ट्या आणखी फिट राहतील. तसेच अतिरिक्त खेळामुळे निर्माण होणार्या तणावाला आळाही बसेल., अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकार्याने दिले आहे.
आता विराट हा श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतहीसहभागी होणार नाही. श्रीलंकविरुद्धची टी -20 मालिका २४ फेब्रुवारीपासून सुरु होईल. पहिला सामना लखनौ येथे होणार आहे. टी-२० मालिकेतील दुसरा व तिसरा सामना हा धर्मशाला येथे खेळला जाईल.
१० दिवसांच्या ब्रेकनंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात विराट पुन्हा टीम इंडियामध्ये असेल. श्रीलंकेविरुद्ध भारत दोन कसोटी सामने खेळणार आहे. चार मार्चपासून सुरु होणारा कसोटी सामना हा विराट कोहलीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण हा विराटचा १०० वा सामना असणार आहे. विराटने आतापर्यंत ९९ कसोटी सामन्यांमध्ये ५०.३९ च्या सरासरीने ७ ह जार ९६२ धावा केल्या आहेत. यामध्ये २७ शतके, २८ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने कसोटीमध्ये तब्बल सात व्दिशतके झळकावली आहेत. त्याची कसोटीमध्ये उच्चांकी धावसंख्या २५४ इतकी आहे.
हेही वाचा :