हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा वॉन्‍टेड दहशतवादी जावेद अहमद मट्टू.
हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा वॉन्‍टेड दहशतवादी जावेद अहमद मट्टू.

दिल्‍ली पोलिसांना मोठे यश..! ‘हिजबुल’चा वॉन्टेड दहशतवादी जेरबंद

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा वॉन्‍टेड दहशतवादी जावेद अहमद मट्टू याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी ही धडक कारवाई केली. जम्मू-काश्मीरमधील अनेक हत्यांमध्ये त्याचा हात असल्‍याचा संशय आहे. त्याची माहिती देणार्‍याला १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्‍यात आले होते. ( Hizbul Mujahideen Terrorist was caught in Delhi)

मट्टू हा सोपोरचा रहिवासी आहे. त्‍याने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिल्‍ली पोलिसांनी दिली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला अटक केली. पोलीस पथकाने मट्टू याच्‍याकडून एक पिस्तूल, मॅगझिन आणि चोरीची कार जप्त केली आहे. मट्टूवर जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप आहे. दरम्‍यान,मागील वर्षी, स्वातंत्र्य दिनाच्या आधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याहमध्‍ये मट्टूचा भाऊ सोपोरमधील त्याच्या घरी तिरंगा फडकवताना दिसत होता. ( Hizbul Mujahideen Terrorist was caught in Delhi)


हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news