T20 World Cup 2024: 9 जूनला भारत-पाकिस्तान महामुकाबला, टी-20 वर्ल्डकपचे संभाव्य वेळापत्रक आले समोर | पुढारी

T20 World Cup 2024: 9 जूनला भारत-पाकिस्तान महामुकाबला, टी-20 वर्ल्डकपचे संभाव्य वेळापत्रक आले समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2024 : अगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये संयुक्तरित्या करण्यात येणार आहे. 3 जून पासून सुरू होणा-या या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. मात्र त्याआधी टीम इंडियाचे सामने कधी खेळवले जातील याचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध लढत असेल. सूत्रांनी दिलेल्या

भारतीय संघाची टी20 विश्वचषक मोहीम 5 जूनपासून सुरू होऊ शकते आणि पहिल्या सामन्यात संघाला आयर्लंडचा सामना करावा लागेल. भारताचा दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानसोबत तर तिसरा सामना 12 जून रोजी अमेरिकेसोबत खेळवला जाऊ शकतो. त्याचबरोबर टीम इंडिया 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध लीग टप्प्यातील शेवटचा सामना खेळू शकते. भारताचे साखळी सामने यूएसएमध्ये खेळवले जातील, तर सुपर 8 फेरीचे सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे, कारण या स्पर्धेला फक्त 5 महिने बाकी आहेत. (T20 World Cup 2024)

भारतीय संघाचे वेळापत्रक

5 जून : विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून : विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क
12 जून : विरुद्ध अमेरिका, न्यूयॉर्क
15 जून : विरुद्ध एस. कॅनडा, फ्लोरिडा
20 जून : विरुद्ध C-1 (न्यूझीलंड) बार्बाडोस
22 जून : विरुद्ध श्रीलंका, अँटिग्वा
24 जून : विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सेंट लुसिया

बार्बाडोसमध्ये रंगणार फायनल (T20 World Cup 2024)

जर भारत सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरला तर त्यांचा पहिला सामना 20 जून रोजी बार्बाडोसमध्ये खेळवला जाईल. भारतीय संघ सुपर 8 चे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळेल अशी शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी त्याच मैदानावर खेळवला जाण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 विश्वचषक खेळण्याची शक्यता

पीटीआयने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 विश्वचषकासाठी संघाचा भाग बनण्यास उत्सुक आहेत. रोहित आणि कोहली हे दोघेही नोव्हेंबर 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यानंतर टी-20 सामने खेळलेले नाहीत. मात्र, टी-20 विश्वचषक 2024 लक्षात घेऊन आयपीएल दरम्यान एकूण 30 खेळाडूंवर नजर ठेवली जाईल. यात रोहित आणि विराट यांचाही समावेश असल्याचे समजते.

Back to top button