टॉयलेट सीटच्या तुलनेत स्मार्टफोनवर दहापट अधिक जीवाणू!

टॉयलेट सीटच्या तुलनेत स्मार्टफोनवर दहापट अधिक जीवाणू!

न्यूयॉर्क ः ज्याला आपण सतत जवळ बाळगत असतो व हाताळत असतो तो स्मार्टफोन टॉयलेट सीटपेक्षाही अधिक घाणेरडा असू शकतो असे म्हटलं तर तुम्हाला पटेल? हल्‍ली अनेकांना माणसांपेक्षाही स्मार्टफोनची संगत अधिक प्रिय वाटत असते. अशावेळी स्मार्टफोनवर टॉयलेट सीटच्या तुलनेत दहापट अधिक जीवाणू असतात असे म्हटले तर अनेकांच्या भुवया निश्‍चितच उंचावतील! यापैकी काही जीवाणू तर अतिशय घातक असतात.

टॉयलेट सीटपेक्षाही अधिक जीवाणू कोणकोणत्या वस्तूंवर असू शकतात याची माहिती वेळोवेळी समोर आलेली आहे. या वस्तूंमध्ये दरवाजाच्या हँडलपासून ते स्वयंपाकघराच्या ओट्यावरील फडक्यापर्यंत अनेक वस्तूंचा समावेश आहे. त्यामध्येच स्मार्टफोनही आहेच.

स्मार्टफोनवर तर टॉयलेट सीटच्या तुलनेत दहापटीने अधिक जीवाणू असतात असे एका संशोधनातून दिसून आलेले आहे. या जीवाणूंमध्ये 'ई कोली' या जीवाणूचाही समावेश आहे. या जीवाणूमुळे अन्‍नातून विषबाधा आणि डायरियासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही जीवाणू मानवी त्वचेला संक्रमित करू शकतात.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news