महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : भाजप नेते प्रवीण दरेकरांची मागणी | पुढारी

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : भाजप नेते प्रवीण दरेकरांची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी विधान परिषद विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राज्‍यात भाजप नेत्‍यांवर हल्‍ले हाेत आहेत. अशावेळी पाेलिस बघ्‍यांची भूमिका घेत आहेत, असा आराेप करत आम्‍हीही जशास तसे उत्तर देवू , असा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला.

  मोहीत कंबोज यांच्या गाडीवर शु्क्रवारी रात्री मातोश्रीबाहेर हल्ला. तर आमदार राणा यांना शिवसेनेचे कार्यकर्ते रस्‍त्‍यावर उतरुन त्‍यांना अडवत आहेत. राज्यातील पोलीस प्रशासन आणि गृह खाते गप्प का ? असा सवालही त्‍यांनी यावेळी केला.  महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपूर्वक भाजपला टार्गेट करत आहे. राज्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍था ढासळली आहे,   असा आराेपही त्‍यांनी केले.

राष्‍ट्रपती राजवटीची मागणी नाही :  अशिष शेलार

यावेळी अशिष शेलार म्‍हणाले की,शिवसेनेच्‍या भष्‍ट्राचाराचा पाेलखाेल आम्‍ही करत असल्‍याने शिवसेना आम्‍हाला टार्गेट करत आहे. आमचे सर्व कार्यक्रम नियमाुसार चालतात, असेही ते म्‍हणाले. भाजप नेत्‍यांवर भ्‍याड हल्‍ले सुरु आहेत.   मोहीत कंबोज यांच्या गाडीवर शु्क्रवारी रात्री मातोश्रीबाहेर हल्ला. तुम्‍हीही गाडीतून कधी तरी एकटे जाल. आम्‍हीही जशास तसे उत्तर देवू, असेही ते म्‍हणाले. आम्‍ही अद्‍याप राष्‍ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्‍या घरावर हल्‍ला झाला हाेता. मुख्‍यंमंत्री ठाकरे यांच्‍या माताेश्री निवासस्‍थानाबाहेरही सुरक्षा व्‍यवस्‍थेत त्रुटी राहिल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.  गृहमंत्रालयाकडून पक्षपातीपणा सुरु आहे. राज्‍यात तक्रारदारासह  संबंधित सर्व घटक असुरक्षित आहेत, असा आराेपही त्‍यांनी केला.

हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद तीव्र झाला आहे. या परिस्थितीवरून भाजपने राज्यातील कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप केला आहे. भाजपचे शिष्टमंडळ या प्रकरणी राज्यपालांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. राणा दाम्पत्य आणि मोहीत कंबोज यांच्यावरील शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेवरून भाजपने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा

Back to top button