NASA : ‘नासा’ विकसित करत आहे नवा अद्ययावत स्पेस सूट

NASA : ‘नासा’ विकसित करत आहे नवा अद्ययावत स्पेस सूट
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'कडून चंद्रावरील आर्टेमिस मोहिमेची जय्यत तयारी केली जात आहे. या मोहिमेत चंद्रावर जाणार्‍या अंतराळवीरांसाठी 'नासा' खास स्पेस सूट विकसित करीत आहे. या स्पेस सूटचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कुलिंग कंट्रोल टेक्नॉलॉजीमध्ये पाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्राच्या उष्ण पृष्ठभागावरील प्रवाशांना तिथे थंड राहण्यासाठी मदत होईल.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर या सूटचे प्रयोग सुरू आहेत.

अंतराळ आणि चंद्रावरील स्थिती मानवासाठी खडतरच असते. अंतराळात स्पेस सूटशिवाय माणसाचा देह अक्षरशः फूटून जाऊ शकतो. अंतराळात विकिरणांचाही मोठा धोका असतो. अन्यही अनेक धोक्यांचा सामना करण्यासाठी स्पेस सूट ही अत्यंत गरजेची बाब असते. शिवाय हा पोशाख आरामदायक वाटावा हे पाहणेही गरजेचे असते. चंद्रावरील आर्टेमिस मोहिमेसाठी 'नासा' स्पेस सूट इव्हॅपोरेशन रिजेक्शन फ्लाईट एक्सपिरिमेंट (सीरी) वापरत आहे.

'नासा' असे स्पेस सूट विकसित करीत आहे जे 100 अंश सेल्सिअसच्या तापमानालाही तोंड देऊ शकेल. 'सीरी' प्रयोगाद्वारे विकसित केलेल्या स्पेस सूटच्या चाचण्या आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक आणि पृथ्वी दोन्ही ठिकाणी सुरू आहेत. या स्पेस सूटचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची लाईफ सपोर्ट सिस्टीम. ती सुरक्षा आणि गारवा दोन्ही देऊ शकेल.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news