मॉस्को : जगभरात अनेक अनोखी झाडे पाहायला मिळतात. अशीच अनोखी झाडे कझाकिस्तानातील एका सरोवरात आहेत. या अजब सरोवराचे नाव आहे 'लेक कँडी'. हे कझाकिस्तानातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. या सरोवरात एक अख्खे जंगलच आहे. या जंगलाला 'उलट्या झाडांचे जंगल' असे म्हटले जाते.
हे सरोवर पाहिल्यावर असे दिसते की पाण्यात उलटी झाडे आहेत. या सरोवराच्या पाण्यातून लाकडी खांब उभे राहिल्यासारखे दिसतात. ही झाडे असून त्यांचा उर्वरित भाग पाण्याखाली असतो. 1911 मध्ये याठिकाणी मोठा भूकंप आला होता. त्यानंतर हा संपूर्ण परिसर पाण्याने भरून गेला. त्यामुळे हे जंगलही पाण्यात बुडाले. हे सरोवर समुद्रसपाटीपासून सुमारे 2 हजार मीटर उंचीवर आहे.
कझाकिस्तानातील अल्माटी शहरापासून ते 291 किलोमीटर दूर आहे. लेक कँडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पाणी अतिशय थंड असून या झाडांसाठी ते एखाद्या फ्रीजसारखे काम करते. हिवाळ्यात हे ठिकाण आईस डायव्हिंगसाठी वापरले जाते. मासेमारीसाठीही इथे अनेक लोक येतात.