अवघ्या 270 रुपयांत तिने खरेदी केली तीन घरे | पुढारी

अवघ्या 270 रुपयांत तिने खरेदी केली तीन घरे

सिसिली : आपल्याकडे घरांचे दर गगनाला भीडत असताना तिकडे इटलीत एका महिलेने चक्क 270 रुपयांना तीन घरे विकत घेतली आहेत. स्वतःचे घर असावे म्हणून लोक आपली आयुष्यभराची पुंजी पणाला लावतात. मात्र, इटलीत एवढ्या स्वस्तात घर मिळतंय हे ऐकून या महिलेने तिकडे धाव घेतली. या महिलेचे नाव आहे रुबिया डॅनियल्स. तिला निवृत्तीनंतर भूमध्य सागरीय देशात सेटल होण्याची इच्छा आहे. जेव्हा तिने वन युरो होम योजना ऐकली तेव्हा ती पुढच्या काही दिवसांत मुसोमेली, सिसिली येथे गेली. तिने या घरासाठी नोंदणी केली आणि तीन दिवसांत तिच्याकडे विमानाचे तिकीट, भाड्याची कार, हॉटेलचे डिटेल्स पोहोचलेसुद्धा. लगेच ती निघाली.

या शहराचे नाव आहे मुसोमेली. सिसिलीच्या मध्यभागी असलेल्या या नगराची एकूण लोकसंख्या आहे सुमारे 10,000. इटलीतील मुख्य भूभागाच्या अगदी जवळचे हे एकबेट आहे. घटत्या लोकसंख्येचा सामना करण्यासाठी मुसोमेली हे इटलीतील फक्त एक जागा असून तिथे आश्चर्यकारक किमतीत तुम्हाला मालमत्ता मिळू शकते. 2019 मध्ये सिसिलियन शहर साम्बुका द सिसिलिया पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नात होते. तेव्हा तिथे सोडून दिलेली घरे अल्प किमतीत म्हणजे एक डॉलर दराने विकली गेली.

नंतर ही किंमत दुप्पट म्हणजे दोन डॉलर झाली. याचे कारण म्हणजे कोव्हिड-19! त्याचवेळी डॅनियल्सने तिथे एक नव्हे तर तब्बल तीन घरांची खरेदी केली. ही घरे म्हटले तर तिला फुकटच मिळाली. डॅनियल्सने सांगितले की, कोव्हिड-19 घडले आणि आम्हाला परत जाण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मी माझ्या घरांचे नूतनीकरण सुरू केले. आतापर्यंत तिने दोन घरांचे बाहेरचे काम पूर्ण केले आहे. आता लवकरच ती तिसर्‍या घरालाही नवा लूक देणार आहे. कोव्हिडमुळे अनेक मालमत्तांना कोणी वालीच उरला नाही. त्याचवेळी डॅनियल्सने घरे खरेदी केली आणि सध्या स्वारी खुशीत आहे.

हेही वाचा : 

Back to top button