नव्या संसद भवनाचे उद्घाटन मोदींनी नव्हे, राष्ट्रपतींनी करावे : राहुल गांधी | पुढारी

नव्या संसद भवनाचे उद्घाटन मोदींनी नव्हे, राष्ट्रपतींनी करावे : राहुल गांधी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे, तर राष्ट्रपतींनी करायला हवे, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा प्रकल्प पंतप्रधानांनी वैयक्तिक प्रतिष्ठेचा बनवला आहे, अशी टीका केली.

येत्या 28 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन होत आहे. राहुल गांधी यांनी या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्घाटक म्हणून निमंत्रण नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मोदी यांनी हा प्रकल्प निष्कारण वैयक्तिक प्रतिष्ठेचा केला आहे. संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे, तर राष्ट्रपतींनी करायला हवे, अशी मागणी केली आहे. एमआयएमचे ओवैसी म्हणाले की, पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख आहेत, कायदेमंडळाचे प्रमुख नाहीत. उद्घाटन करायचेच होते तर लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींनी करायला हवे होते.

Back to top button