Smoking : धूम्रपानामुळे मेंदूवरही होतो विपरित परिणाम | पुढारी

Smoking : धूम्रपानामुळे मेंदूवरही होतो विपरित परिणाम

नवी दिल्ली : ‘नाकाचा वापर धुराड्यासारखा व्हावा अशी परमेश्वराची इच्छा असती तर त्याने नाकपुड्या उफराट्या ठेवल्या नसत्या का?’ असे प्रख्यात कृषिशास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर म्हणत. तरीही जगभरात धूम—पानाचे व्यसन करणारे अनेकजण आहेत. धूम—पान, मद्यपान हे आरोग्यासाठी धोकादायक आहेत हे अनेकजण लक्षात घेत नाहीत. धूम—पानासारख्या व्यसनामुळे कर्करोग, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. धूम—पानामुळे फुफ्फुसावर प्रतिकूल परिणाम होतो. आता एका नवीन संशोधनातून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. धूम—पानामुळे मेंदूवरही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, असे हे नवीन संशोधन सांगते. (Smoking)

नवीन संशोधनानुसार, रोज धूम—पान करणार्‍यांचा मेंदू कधीही धूम—पान न करणार्‍यांपेक्षा 0.4 घन इंच लहान असतो. यासाठी संशोधकांनी यूके बायोबँकमधील लोकांच्या मेंदूच्या स्कॅनचे आणि त्यांच्या धूम—पानाच्या सवयीचे विश्लेषण केले. या संशोधनात सहभागींचे 2006 ते 2010 आणि 2012 ते 2013 दरम्यान सर्वेक्षण केले गेले. दुसर्‍या टप्प्यात त्यांचा एमआरआय करण्यात आला.

ज्या लोकांनी कधीही धूम—पान केलेलं नाही त्यांच्या मेंदूचा आकार सामान्य असल्याचे एमआरआय चाचणीतून दिसून आले. या चाचणीत धूम—पान करणार्‍यांच्या मेंदूचा ग्रे भाग 0.3 घन इंच तर व्हाईट भाग 0.1 घन इंच कमी झाल्याचे दिसून आले. मेंदूचा ग्रे भाग भावना, स्मरणशक्तीत महत्त्वाची भूमिका बजावतो. तर पांढरा भाग माहिती हस्तांतरणाचे काम करतो. सततच्या धूम—पानामुळे मेंदूच्या संकुचिततेवर तीव— परिणाम झाल्याचे दिसून आले; पण ज्यांनी ही सवय सोडली त्यांच्या मेंदूच्या वस्तुमानात उलटी घट झाली. धूम—पान न करणार्‍या व्यक्तींच्या मेंदूतील ग्रे भागात 0.005 घन इंचाने वाढ होते, असे मेडरिस्कच्या संशोधनात दिसून आले. अद्याप समवयस्क व्यक्तींचे यासंदर्भात पुनरावलोकन करण्यात आलेले नाही.

हेही वाचा; 

Back to top button