वर्धा: बाजार समितीच्या सभापतीपदी अमित गावंडे, उपसभापतिपदी पांडुरंग देशमुख | पुढारी

वर्धा: बाजार समितीच्या सभापतीपदी अमित गावंडे, उपसभापतिपदी पांडुरंग देशमुख

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीची निवड प्रक्रिया आज (दि.१७) पार पडली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या निवड प्रक्रियेत सभापती आणि उपसभापतीपदी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ संचालकांपैकी १३ संचालक काँग्रेसकडे तर ५ संचालक राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती, उपसभापतीची निवड करण्यासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी सभापती म्हणून अमित गावंडे यांची तर उपसभापती म्हणून पांडुरंग देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.

सभापती, उपसभापतीपदाकरीता प्रत्येकी एकच अर्ज आला होता. निवडणूक अधिकारी म्हणून प्रकाश भजनी, सहायक निवडणूक अधिकारी अनिल वडे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पेंडके उपस्थित होते.

निवडणुकीवेळी पाच संचालक उपस्थित नव्हते. यावेळी तेरा संचालक उपस्थित होते. सभापती, उपसभापतीची बिनविरोध निवड झाल्यानंतर गुलाल लावून पेढे भरवून फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला. सभापती, उपसभापतींचे आमदार रणजित कांबळे यांनी स्वागत केले.

हेही वाचा 

Back to top button