Hanuman Chalisa : यू ट्यूबवर ‘हनुमान चालिसा’ची कोटीच्या कोटी उड्डाणे! | पुढारी

Hanuman Chalisa : यू ट्यूबवर ‘हनुमान चालिसा’ची कोटीच्या कोटी उड्डाणे!

नवी दिल्ली : संत तुलसीदासांनी लिहिलेली ‘हनुमान चालिसा’ (Hanuman Chalisa) अनेकांच्या रोजच्या वाचनात असते. काही लोक ती संगीतबद्ध रूपातही ऐकत असतात. हनुमान चालिसा व मारुतीरायावरची लोकांची दृढ श्रद्धा ओळखून ‘टी सीरिज’ने 10 मे 2011 ला यू ट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हरिहरन यांच्या आवाजातील आणि गुलशन कुमार अभिनित ‘हनुमान चालिसा’ हा व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडीओला यंदा 12 वर्षं झाली आहेत. हा व्हिडीओ 9 मिनिट आणि 42 सेकंदाचा आहे. आजपर्यंत हा व्हिडीओ 3 अब्ज म्हणजेच 300 कोटी लोकांनी बघितला आहे आणि त्याला 1 कोटी 20 लाख लोकांनी लाईक्स दिले आहेत. हा एक नवा उच्चांक आहे

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय नागरिक वेगवेगळ्या देशांत राहात आहेत. मोबाईलमध्ये सोशल मीडिया आता सहज उपलब्ध झाल्याने जगाच्या पाठीवर कुठेही असल्यास आणि इंटरनेट उपलब्ध असल्यास, हे व्हिडीओ कुठेही, केव्हाही आणि कितीही वेळा बघता येतात. त्याचा लाभ जगभरातील अनेक हनुमानभक्त (Hanuman Chalisa) घेत असतात. आता ‘हनुमान चालिसा’ला मिळालेले हे व्ह्यूज पाहून त्याची खात्री पटते!

हेही वाचा : 

Back to top button