संरक्षणमंत्री राजनाथसिंह आज पुण्यात; आफ्रिका-भारत संयुक्त सरावाची करणार पाहणी | पुढारी

संरक्षणमंत्री राजनाथसिंह आज पुण्यात; आफ्रिका-भारत संयुक्त सरावाची करणार पाहणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारत आणि आफ्रिका खंडातील 23 राष्ट्रांच्या दुसर्‍या संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण (फिल्ड ट्रेनिंग) (अऋखछऊएद- 2023) सरावाची पाहणी संरक्षणमंत्री राजनाथसिंह करणार आहेत. खडकी रेंजहिल्स सिम्बायोसिस येथे होणार्‍या बैठकीस संरक्षणमंत्री उपस्थित राहणार आहेत. पुणे येथील औंधमधील परदेशी प्रशिक्षण विभागात सुरू असलेल्या प्रशिक्षण सरावात अनेक देशांचे सैनिक सहभागी झाले आहेत. मंगळवारी (दि. 28) दुपारी सरावाच्या पाहणीनंतर जी-20 परिषदेची वैचारिक बैठक होणार आहे.

भारत-आफ्रिका शिखर परिषदेनंतर आफ्रिकेशी अधिकाधिक संपर्क कायम राखण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा सराव होत आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून भूसुरूंगविरोधी कारवाई करणे आणि शांतता प्रस्थापित करणे यासंबंधी प्रशिक्षण दिले जात आहे. सामरिक कवायती आणि कारवाई संयुक्तपणे करण्याची क्षमता हा या संयुक्त सरावाचा केंद्रबिंदू आहे. याबरोबरच 28 ते 30 मार्च 2022 या कालावधीत लष्करप्रमुखांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दरम्यान लष्करप्रमुख संयुक्त सरावाची पाहणी मंगळवारी (दि.28) करणार आहेत.

Back to top button