Flying Taxi Service : दुबईत सुरू होणार फ्लाईंग टॅक्सी सर्व्हिस

Flying Taxi Service
Flying Taxi Service
Published on
Updated on

दुबई : आता 'उडती कार' ही संकल्पना केवळ विज्ञानकथेपुरती किंवा चित्रपटांपुरती मर्यादित राहिलेली नाही. जगभरात अनेक देशांमध्ये अशा उडत्या मोटारी (Flying Taxi Service) बनवण्यात आल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबईत तर आता नजीकच्या भविष्यात फ्लाईंग टॅक्सी सर्व्हिस सुरू होण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

दुबईच्या रस्ते आणि परिवहन प्राधिकरणातील सार्वजनिक परिवहन एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद बहरोज्यान यांनी म्हटले आहे की अशा हवाई टॅक्सीची सेवा (Flying Taxi Service) माफक दरात उपलब्ध होईल. 2026 पर्यंत अशी फ्लाईंग टॅक्सी सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा दुबई सरकारने अलीकडेच केली आहे. अशी उडती टॅक्सी लोकांना 'ट्रॅफिक जाम'च्या समस्येतून सोडवू शकेल व वेळेची मोठी बचत करता येईल. लोकांना आपल्या गंतव्य स्थानी आरामात व वेगाने जाता येईल.

फ्लाईंग टॅक्सीवर अनेक स्टार्टअप्स व बड्या कंपन्याही काम करीत आहेत. चिनी कंपनी एक्सपेंग एरोहटशिवाय अन्यही अनेक कंपन्यांचे काम सुरू आहे. त्यामध्ये 'स्कायड्राईव्ह' नावाची कंपनी आघाडीवर आहे. कंपनीने 2021 मध्ये आपल्या पहिल्या फ्लाईंग कारचे (Flying Taxi Service) अनावरणही केले होते. आशियातील पहिली हायब-ीड फ्लाईंग कार भारतात चेन्नईच्या विनाटा एरोमोबिलिटीकडून बनवली जात आहे. ती याचवर्षी जगासमोर आणली जाऊ शकते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news