इज्जतीचा पंचनामा… स्मृतीचा पगार बाबर आझमच्या दुप्पट

इज्जतीचा पंचनामा… स्मृतीचा पगार बाबर आझमच्या दुप्पट
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : महिला प्रीमियर लीगचा पहिला मेगा लिलाव सोमवारी झाला. या लिलावात एकूण पाच संघांनी सुमारे 60 कोटी रुपये खर्च करून 87 खेळाडूंना खरेदी केले. 13 फेब्रुवारी हा दिवस क्रिकेट जगतासाठी ऐतिहासिक ठरला. या दिवशी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचा लिलाव झाला. मार्की स्पर्धेसाठी एकूण 448 महिला खेळाडूंची निवड करण्यात आली होती, त्यापैकी एकूण 92 खेळाडूंना बोली लागली. मराठमोळी स्मृती मानधना ही 3.40 कोटी रुपये मिळवून सर्वात महागडी खेळाडू ठरली. स्मृतीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या ताफ्यात घेतले.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिला

मुंबई इंडियन्सने 1.80 कोटींमध्ये करारबद्ध केले, तर आरसीबीने लिलावात भारताची उपकर्णधार मानधना नंतर ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीवर धनवर्षाव केला. महिला प्रीमियर लीगच्या लिलावात बेंगलोरचा खर्च पाहता चाहत्यांनी सोशल मीडियावर एक नवीन मोहीम सुरू केली आहे. महिला आयपीएल आणि पाकिस्तान क्रिकेट लीग (पाकिस्तान सुपर लीग) यांची तुलना करून लोकांनी बाबर आझमला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

बाबरला पीएसएलमध्ये मिळतात दीड कोटी रुपये

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो सध्या पेशावर झल्मीकडून खेळत आहे आणि त्याला पाकिस्तानी रुपयानुसार 3.60 कोटी मिळतात, पण भारतीय रुपयात ही रक्कम मोजली तर ती 1.50 कोटीपेक्षा कमी आहे. त्याच वेळी, भारताच्या स्मृती मानधनाला महिला प्रीमियर लीगमध्ये प्रति हंगाम 3.40 कोटी रुपये मिळत आहेत.

महिला प्रीमियर लीगमध्ये 7 खेळाडू आहेत, ज्यांची किंमत 2 कोटी किंवा त्याहून अधिक आहे. यातील तीन खेळाडूंना तीन कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. एका चाहत्याने ट्विट केले, स्मृती मानधनाचा डब्ल्यूपीएल पगार आता बाबर आझमच्या पीएसएल पगारापेक्षा जास्त आहे. आणखी एका ट्विटर युजरने लिहिले, पीएसएलमध्ये बाबर आझमची किंमत 2.30 कोटी. स्मृती मानधना 3.40 कोटी आणि हे पीएसएलची आयपीएलशी तुलना करतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news