‘पुढारी-टोमॅटो एफ.एम. शॉपिंग उत्सव 2022’चा शुक्रवारी बंपर ड्रॉ

‘पुढारी-टोमॅटो एफ.एम. शॉपिंग उत्सव 2022’चा शुक्रवारी बंपर ड्रॉ
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे मिळवून देणार्‍या दैनिक 'पुढारी' आणि 94.3 टोमॅटो एफ.एम. आयोजित शॉपिंग उत्सव 2022 चा बंपर ड्रॉ शुक्रवार, दि. 17 फेब—ुवारी रोजी होणार आहे. हा कार्यक्रम कमला कॉलेजजवळील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात दुपारी चार वाजता आयोजित केला आहे. शॉपिंग उत्सव 2022 मध्ये सहभागी झालेल्या भाग्यवान बक्षीस विजेत्यांची घोषणा या बंपर ड्रॉमध्ये होणार आहे.

या उत्सवात सहभागी दुकानातून खरेदी करणार्‍या ग्राहकांना कुपन दिले होते. ते कुपन्स भरून ग्राहकांनी संबंधित दुकानात जमा केली होती. त्या ग्राहकांमधून या भाग्यवान विजेत्या ग्राहकांची नावे ड्रॉ पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते काढण्यात येणार आहेत. या उपक्रमात कुपन्स जमा केलेल्या ग्राहकांनी मोठ्या संख्येने या बंपर ड्रॉच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

दसरा-दिवाळीच्या काळात 26 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2022 दरम्यान हा शॉपिंग उत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवात सहभागी होत असंख्य कोल्हापूरकरांनी खरेदीचा आनंद लुटला होता. एस.एस. मोबाईल्स या शॉपिंग उत्सवाचे मुख्य प्रायोजक होते. तनिष्क (टाटा) हे सहयोगी प्रायोजक होते, तर महेंद्र ज्वेलर्स, स्फूर्ती, मेसर्स गोपिनाथ अनंत चिपडे सराफ, भाऊसिंगजी रोड आणि वारणा सहकारी बँक हे सहप्रायोजक होते.

यावेळी ड्रॉ पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते भाग्यवान बक्षीस विजेत्या ग्राहकांच्या नावाचे कुपन्स काढून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. या बंपर ड्रॉमध्ये पहिले बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरे बक्षीस अर्धा तोळे सोने, तिसरे बक्षीस वॉशिंग मशिन, चौथे बक्षीस स्मार्टफोन यासह अन्य भरपूर सरप्राईज गिफ्ट या उत्सवात सहभाग घेतलेल्या ग्राहकांना मिळणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news