Google : ‘गुगल’ने भारतीय हॅकर्सना दिले लाखो रुपये! | पुढारी

Google : ‘गुगल’ने भारतीय हॅकर्सना दिले लाखो रुपये!

वॉशिंग्टन : अनेक टेक कंपन्या आपल्या तंत्रज्ञानातील उणीवा, त्रुटी शोधत असतात जेणेकरून हे तंत्रज्ञान अधिक उपयुक्त व सुरक्षित ठरेल. त्यांच्या त्रुटी शोधून काढणार्‍या लोकांना मोठी बक्षिसेही दिली जात असतात. जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन ‘गुगल’ (Google) ने आता दोन भारतीय हॅकर्सना चक्क लाखो रुपये दिले आहेत. त्यामागेही असेच कारण आहे.

एरव्ही ‘हॅकिंग’ म्हटले की गुन्हेगारीच्या घटनाच आठवतात. मात्र, काही वेळा एखाद्या तंत्रज्ञानातील त्रुटी दाखवण्यासाठीही असे हॅकिंग केले जात असते. त्यामुळेच गुगल कंपनीने दोन भारतीय हॅकर्सना 18 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. या दोन्ही हॅकर्सनी गुगलच्या (Google) क्लाऊड प्रोग्राममध्ये काही त्रुटी शोधून काढल्या होत्या त्यामुळे त्यांना हे बक्षीस मिळाले आहे.

गुगल (Google) हे बग बाऊंटी प्रोग्राम अंतर्गत लोकांना बक्षीस देते. श्रीराम केएल आणि शिवेश अशोक या दोन भारतीय हॅकर्सनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांनी गुगलच्या सॉफ्टवेअरमध्ये विशेषतः गुगल क्लाऊडच्या फीचर्समध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी त्यांनी गुगलला सांगितल्या होत्या. त्यामुळे गुगल कंपनीने या दोन भारतीय हॅकर्सना 18 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे.

हेही वाचा ; 

Back to top button