हाफिज सईदचा मेहुणा मक्‍की संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय ‘दहशतवादी’ घोषित | पुढारी

हाफिज सईदचा मेहुणा मक्‍की संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय 'दहशतवादी' घोषित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला संयुक्‍त राष्‍ट्र परिषदेने ( यूएनएससी)  आतंरराष्‍ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.  मक्‍की हा लश्‍कर-ए-तोयबाचा म्‍होरक्‍या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा मेहुणा आहे. त्‍याच्‍या अनेक दहशतवादी कारवायांमध्‍ये सहभाग होता. जून २०२२ मध्‍ये चीनने अब्दुल रहमान मक्कीची पाठराखण केली होती. या मुद्द्यावर भारताने चीनला फटकारले होते. ( Makki Global terrorist )

चीनने पाठराखण केलेल्‍या मक्‍कीच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

संयुक्‍त राष्‍ट्राच्‍या सुरक्षा परिषदेच्‍या समितीने १६ जानेवारी २०२३ रोजी अब्दुल रहमान मक्की याच्‍या नावाचा समावेश आतंरराष्‍ट्रीय प्रतिबंधित यादीत केला आहे ‘यूएनएससी’मधील  ठरावानुसार, मक्कीवरील आथिंक प्रतिबंध असतील. तसेच  शस्त्रे खरेदी आणि अधिकार क्षेत्राबाहेर प्रवासही तो करु शकणार नाही. भारत आणि अमेरिकेने यापूर्वीच मक्कीला त्यांच्या कायद्यांतर्गत दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे. अब्दुल रहमान मक्की याला आतंरराष्‍ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव भारताने मागील वर्षी संयुक्‍त राष्‍ट्रमध्‍ये मांडला होता. मात्र याला चीनने या प्रस्‍तावााला विरोध केला होता. या मुद्द्यावर भारताने चीनला फटकारले होते.

Makki Global terrorist : अनेक दहशतवादी हल्‍ल्‍यांमध्‍ये सहभाग

अब्दुल रहमान मक्की हा दहशतवादांना आर्थिक रसद पुरवणे, तरुणांना हल्ल्यासाठी प्रवृत्त करणे, भारताविरुद्ध विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्‍याचे यापूर्वीच स्‍पष्‍ट झाले होते. मक्की हा लश्‍कर-ए-तोयबाचा म्‍होरक्‍या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा मेहुणा आहे. त्‍याचा अनेक दहशतवादी हल्‍ल्‍यांमध्‍ये सहभाग होता. सईद याच्‍यानंतर मक्कीकडेच तोयबाची सूत्रे आहेत. तसेच तो पाकिस्‍तानमधील जमाद-उद-दावा राजकीय पक्षाचाही प्रमुख आहे.

भारताविरोधात ओकली होती गरळ

२०१० मध्ये त्‍याने भारताविरोधात गरळ ओकली होती. त्‍यामुळे तो चर्चेत आला होता. पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या आठ दिवसांपूर्वी त्यांनी मुझफ्फराबादमध्ये भाषण करून पुण्यासह भारतातील तीन शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली होती. भारताच्या मागणीवरून अमेरिकेने मक्कीला दहशतवादी घोषित केले होते.

 

Back to top button