121 year old youth : वयाच्या १२१ व्या वर्षीही ‘ते’ तंदुरुस्त; नातीने उलगडले दीर्घायुष्याचे आणि तंदुरुस्तीचे रहस्य | पुढारी

121 year old youth : वयाच्या १२१ व्या वर्षीही 'ते' तंदुरुस्त; नातीने उलगडले दीर्घायुष्याचे आणि तंदुरुस्तीचे रहस्य

ब्राझिलिया : वयाची चाळीशी गाठली तरी अनेकांचे नेत्र पैलतीराला लागत असतात. अशा स्थितीत शंभरी गाठून किंवा ओलांडूनही जीवनेच्छा बाळगणारे व तंदुरुस्त राहणारे लोक जगाच्या पाठीवर आहेत. जगातील सर्वाधिक वयाच्या लोकांमध्ये ब्राझिलच्या अँड्रेलिनो व्हिएरा दा सिल्वा यांचा समावेश होतो. त्यांचे वय तब्बल 121 वर्षे (121 year old youth) आहे. या वयातही ते तंदुरुस्त आहेत, हे विशेष!

अँड्रेलिनो (121 year old youth)  यांच्या नातीने त्यांच्या दीर्घायुष्याचे आणि तंदुरुस्तीचे रहस्य उलगडून सांगितले आहे. ते समजूतदार, बुद्धिमान व्यक्ती आहेत आणि सक्रिय जीवन जगतात. ते स्वतःचे जेवण स्वतःच बनवतात. अर्थात, साधे अन्नच त्यांना आवडते. आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींकडेही त्यांचे लक्ष असते आणि साधे जीवन ते जगतात. त्यांना नृत्याचीही आवड आहे आणि नेहमी नृत्य करीत असतात. यामधून त्यांचा चांगला व्यायामही होतो व मूडही चांगला राहतो. अनेक वेळा ते स्वतःला एक मोठा ‘स्टार’ मानतात. अनेक तरुण त्यांना भेटण्यासाठी येतात व त्यावेळी ते हौसेने त्यांच्यासमवेत फोटो काढून घेतात.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी आपला 121 वा वाढदिवस (121 year old youth)  साजरा केला होता व त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ते कोरोनापासून एकदाचे बचावले! कागदपत्रांनुसार अँड्रेलिनो यांचा जन्म 1901 मध्ये झाला. याच वर्षी इंग्लंडच्या महाराणी व्हिक्टोरिया यांचे निधन झाले होते. अँड्रेलिनो यांच्याकडे आपल्या जन्मवर्षाबाबतची कागदपत्रेही आहेत. त्यांना सात अपत्ये असून त्यापैकी सध्या पाच हयात आहेत. त्यांना तेरा नातवंडे आणि सोळा परतवंडे आहेत.

संबंधित बातम्या

हेही वाचा : 

Back to top button