महाराष्ट्र व्हिजन फोरमची स्थापना : आमदार रोहित पवार यांची माहिती | पुढारी

महाराष्ट्र व्हिजन फोरमची स्थापना : आमदार रोहित पवार यांची माहिती

पुणे : राजकीय आणि धोरण प्रक्रियेसंदर्भातील युवाकेंद्रीत कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचे व्यासपीठ राज्यातील युवकांना उपलब्ध झाले आहे. शाश्वत विकास साधण्यासाठी योग्य कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासाठी महाराष्ट्र व्हिजन फोरमची स्थापना करण्यात आल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (दि.12) पत्रकार परिषदेत दिली.

युवकांना एकत्र आणण्यासाठी एक चळवळ या माध्मयातून उभी केली जाईल. हे राजकीय व्यासपीठ नसेल. राज्यातील सुमारे साठ टक्के लोकसंख्या चाळीस वर्षांखालील असली तरी सार्वजनिक धोरण यंत्रणेत युवकांचा सहभाग अत्यल्प आहे. चाळीस वर्षांखाली खासदार आणि आमदारांचे प्रतिनिधित्व हा विषय आहे. तरुणांसाठी असे कोणतेही व्यासपीठ नाही जिथे शासन आणि धोरण निर्मिती प्रक्रियेत युवा वर्ग उपयुक्त योगदान देऊ शकेल. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र व्हिजन फोरमची स्थापना करण्यात आली आहे. युवकांनी प्राधान्यक्रमाने केलेल्या सूचना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविल्या जातील आणि शाश्वत विकास योग्य कार्यक्रम पत्रिका तयार केली जाईल, असे पवार यांनी सांगितले.

Back to top button