baby’s Helmets : बाळाच्या डोक्याला हवा तसा आकार देणारे हेल्मेट!

baby's Helmets
baby's Helmets

सिंगापूर : कुठे कसले 'फॅड' येईल हे काही सांगता येत नाही. सिंगापूरमधील एक महिला आपल्या नवजात बाळाच्या डोक्यावर नेहमी एक हेल्मेट (baby's Helmets) घालत असते. आपल्या बाळाचे डोके पूर्ण गोलाकार दिसावे, अशी तिची इच्छा आहे. सर्व बाजूंनी नीट गोल डोके असलेले लोक सुंदर दिसतात असे तिला वाटते. असे करणारी ही महिला एकटीच नाही. आशियातील अनेक देशांमध्ये सध्या अशा हेल्मेटचे फॅड आलेले आहे. विशेषतः चीन व चीनच्या शेजारी असलेल्या आग्नेय आशियातील देशांमध्ये हा प्रकार अधिक पाहायला मिळतो.

हा ट्रेंड गेल्या काही महिन्यांमध्ये वेगाने वाढला आहे. त्याचे कारण आहे चीनची 'मॉम इन्फ्लुएंसर्स'. यू ट्यूब आणि अन्य सोशल मीडियावर या मॉम इन्फ्लुएंसर्स पॅरेंटिंगच्या टिप्स देत असतात. त्यांनी अनेक देशांमध्ये नवजात बाळांना हेल्मेट  (baby's Helmets) परिधान करण्याची वैज्ञानिक आणि सुरक्षित पद्धत सांगून ती ट्रेंडमध्ये आणली. एका चिनी ऑनलाईन इन्फ्लुएंसरने आपल्या मुलीला 'करेक्शन हेल्मेट' घातले व त्याची माहिती इतरांना सांगत त्याच्या प्रसाराला हातभारही लावला. अशा प्रकारचे 'करेक्शन हेल्मेट' सिंगापूर व अन्य काही देशांमध्ये धडाक्याने विकले जात आहेत. डोक्याचे माप देऊन ते बनवून घेतले जाऊ शकतात.

डॉक्टरांचे याबाबत म्हणणे आहे की, नवजात मुलं ही अत्यंत नाजूक असतात. त्यांच्या देखभालीत झालेली छोटीशी चूकही महाग पडू शकते. त्यामुळे कधीही सोशल मीडियावरून पॅरेंटिंगच्या टिप्स घेऊ नयेत. मॉम इन्फ्लुएंसर्सनी सांगितलेली कोणतीही गोष्ट अंमलात आणण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (baby's Helmets) बर्‍याच वेळा घरातील आई, आजी, काकू, मावशी यांचा सल्ला अशा मॉम इन्फ्लुएंसर्सपेक्षा अधिक चांगला असतो.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news